शासनाच्या निषेधार्थ समाजकल्याण अधिकाऱ्यांचे जमिनीवर बसून काम

0
24
नागपूर : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  समाजकल्याण विभागातील राजपत्रित अधिकारी संघटने गुरुवारपासून सतरंजीवर बसून काम करणे सुरू केले आहे. आंदोलनाच्य पहिल्या दिवशी येथील सामाजिक न्याय भवनात अधिका-यांनी जमिनीवर सतरंजी टाकून कामकाजाल सुरुवात केली. ऐरवी खुर्चीवर बसणारे अधिकारी खाली बसलेले पाहून अभ्यागतांनाही आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे विविध कामांसाठी कार्यालयात येणा-या अभ्यागतांना बसायला खुर्च्या दिल्या जात होत्या.अधिकाऱ्यांचच्या मागण्यांसाठी  सातत्याने पाठपुरावा करुन सुद्धा शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आंदोलन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनाचा परिणाम जात प्रमाणपत्र वाटपावर होण्याची शक्यता आहे.