८७ दुर्धर व गंभरी बालकांची आरोग्य तपासणी

0
13
वाशिम, दि.२४– एकात्मीक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामार्फत ६ महिने ते ३ वर्ष आणि ३ ते ६ वर्षाच्या गरोदर महिला, स्तनदा माता यांना विविध संदर्भ सेवा पुरविण्यात येतात. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या सुचनेनुसार ग्रामीण भागातील ० ते ६ महिने, ६ महिने ते ३ वर्ष आणि ३ ते ६ वर्षाच्या गरोदर महिला स्तनदा माता यांचे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले.या सर्व्हेक्षणात दुर्धर व गंभीर बालके आढळून आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत यांनी १६ जून रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक जिल्हा आरोग्य अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांची संयुक्त सभा घेऊन सदर दुर्धर व गंभीर बालकांच्या आरोग्य तपासणीकरीता २१ जून २०२२ रोजी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय व २३ जून २०२२ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये दुर्धर बालकांची तपासणी करुन घेण्याकरीता बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करुन सदर आरोग्य तपासणीमध्ये एकूण ८७ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या दुर्धर व गंभीर बालकांना योग्य औषधोपचार व बालकांच्या पालकांना सदर आजारासंबंधी जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरद्वारे समुपदेशन करण्यात आले. ज्या बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या मार्गदर्शनानुसार शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. या दुर्धर व गंभीर बालकांच्या तपासणीकरीता चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच दुर्धर गंभीर बालकांमध्ये आरोग्य सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.