देशात समता आणायचीअसेल तर शाहू महाराज समजून घेणे गरजेचे – प्राध्यापक सविता हजारे

0
15

यवतमाळ-लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने यवतमाळ स्थित विश्रामगृहामध्ये भारतीय ओबीसी शोषित संघटन तथा ओबीसी जनमोर्चा च्या वतीने शाहू महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक सविता हजारे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष-डॉ. ज्ञानेश्वर गोरे, उपाध्यक्ष- विलास काळे हे होते.
ओबीसीचे आरक्षण समजून घेऊन समता जर निर्माण करायची असेल तर आपल्याला शाहू महाराजांची तमाम चळवळ शाहू महाराजांची भूमिका शाहू महाराजांनी केलेले कार्य समजून घ्यावे लागेल अशा पद्धतीची भूमिका उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी वासुदेव खेरडे साहेबराव पारदे आशिष नरुले, संजय राजगुरे, संतोष झेंडे, विदर्भ अध्यक्ष – सुनीता काळे जिल्हाध्यक्ष- माया गोरे, समन्वयक – माधुरी फेंडर, अनिता गोरे, नीता दरणे, मधुकर चोपडे, अरुण शेंद्रे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने समतेचा जागर आता घराघरामध्ये झाला पाहिजे आणि माणसामाणसांमध्ये प्रेम निर्माण झाले पाहिजे ही भूमिका सर्वांनी याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वासुदेव खेरडे यांनी केले तर संचलन सुनिता काळे यांनी केले.