ग्रा.पं.मुंडीपार येथे माजी मुख्यमं
गोरेगांव:- कृषीदिन म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्म दिवस संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येते.
महाराष्ट्राच्या शेतकर्यांचा राजा म्हणून यांची ओळख आहे.माझा महाराष्ट्र व शेतकरी सुजलाम सुफलाम झालाच पाहिजे यासाठी सतत कार्यरत राहून विकास घडवून आणणार्या या नेत्याची ओळख आहे.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त ग्राम पंचायत मुंडीपार तर्फे ग्राम पंचायत कार्यालयात वृक्षलागवड करुन साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला ग्राम मुंडीपारचे सरपंच सुमेंद्र धमगाये,उपसरपंच जावेद (राजाभाई)खान, तंमुस अध्यक्ष गिरीश पारधी, माजी सरपंच बोथली घनश्याम चौव्हाण,श्यामा प्रसाद मुखर्जी वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष टुकेंद्र भगत,तंमुस सदस्य संजु राहांगडाले, ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर, संघनक परिचालक रोहित पांडे, लिपिक सुनिल वाघाडे, परिचर अजय नेवारे,उमेश राऊत,रोहित नेवारे आदी उपस्थित होते..