मुंडीपार तंटामुक्त समितीच्यावतीने तातडीच्या प्रकरणाचा निपटारा

0
29
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोरेगांव,दि.04:- ग्रामपंचायत मुंडीपार येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती मार्फत अती तातडीच्या प्रकरणाचा निपटारा गावातच करण्यात आला. 15ऑगस्ट 2007 साली या योजनेची सुरुवात झाली. गावाचा विकास गावातच झाला पाहिजे तसेच त्या त्या गावातील प्रश्न देखील त्याच ठिकाणी सोडवता आले पाहिजे तसेच गावात तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून ग्राम मुंडीपार येथील तंटामुक्त समिती प्रतिबंधात्मक उपाय करत आहे.
ग्राम मुंडीपार येथील तंटामुक्त समितीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळी तंमुस अध्यक्ष गिरीश पारधी, सरपंच सुमेंद्र धमगाये,उपसरपंच जावेद (राजाभाई खान),माजी तंमुस अध्यक्ष नामदेव नेवारे, ग्रामरोजगार सेवक/तंमुस सदस्य उमेंद्र ठाकुर, तंमुस सदस्य ज्ञानेश्वर राऊत,तंमुस सदस्य रामुजी शरणागत,तंमुस सदस्य चेतलाल चौधरी,सामाजिक कार्यकर्ता गेवेंद्र भगत सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र बिसेन,मंगरु भिमटे,अर्जदार,गैरअर्जदार व अन्य गावकरी उपस्थित होते.