अतिवृष्टीमुळे खजरी-खोडशिवनी-कोसमतोंडी मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला

0
40

सडक अर्जुनी,दि.05ः- गोंदिया जिल्ह्यात सोमवार आणि मंगऴवारला झालेल्या जोरदार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.तर दुसरीकडे या पावसाने नदीनाल्यांना पुल आल्याने काही लहानमार्ग बंद होऊन संपर्क सुध्दा तुटला आहे.सोबतच सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते खोडशिवनी-कोसमतोंडी मार्गावरील नाल्यावर तयार करण्यात आलेलाय पर्यायी पूल या अतिवृष्टीत वाहून गेल्याने खजरी-खोडशिवनीचा सडक संपर्क तु़टला गेला आहे.

सविस्तर असे की खजरी खोडशिवनी मार्गावरील नाल्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु असून या बांधकामामुळे नागरिकांसाठी शेजारीच पर्यायी मार्ग तयार करण्यात आलेला होता.मात्र सोमवारला आलेल्या जोरदार पावसाने तो पूर्णतः वाहून गेल्यामुळे या महत्वपूर्ण रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.खोडशिवनी येथील शेतकरीबांधवाची शेती ही म्हसवानी व घोटी परिसरात असल्याने आणि पुल वाहून गेल्याने रोवणीच्या कामासाठी जाणार्या शेतकर्यासमोर अडचण निर्माण झाली आहे.सोबतच खजरी येथील कनिष्ठ महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी यांच्या अभ्यासक्रमाचे नुकसान होत आहे. सदर मार्ग महत्वाचा असून तालुक्याला व जिल्हा ठिकाणी जाणारा असल्याने याठिकाणी तातडीने पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.