
गोंदिया,दि.5 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा न्यायालय गोंदिया येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 29 जून रोजी अमली पदार्थाचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी दिनानिमीत्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.
ए.एम.खान जिल्हा न्यायाधीश गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून डॉ.अमित जोगदंडे सहा.प्राध्यापक, शासकीय महाविद्यालय गोंदिया यांनी उपस्थित न्यायिक अधिकारी/कर्मचारी तसेच सर्व वकील वर्ग यांना अमली पदार्थाचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास एन.डी.खोसे तदर्थ जिल्हा न्यायाधीश, एन.बी.लवटे तदर्थ जिल्हा न्यायाधीश, एस.व्ही.पिंपळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्यायाधीश सर्वश्री आर.एस.कानडे, ए.व्ही.कुलकर्णी, एस.आर.मोकाशी, व्ही.ए.अवघडे, एम.बी.कुडते, वाय.जे.तंबोली, एस.डी.वाघमारे, श्रीमती एन.बी.घाटगे तसेच वकील सी.के.बडे, जिल्हा वकील संघाचे सचिव एस.आर.बोरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन वकील शबाना अंसारी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार वकील राजकुमारी कटरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.जे.ठाकरे, ए.एम.गजापुरे, सचिन कठाणे, पी.एन.गजभिये, एस.डी.गेडाम, बी.डब्ल्यू.पारधी यांनी सहकार्य केले.