
* *कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकारी गजभिये यांना निवेदन*
गोंदिया – मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी दि. १ ऑगष्टला कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. महेंद्र गजभिये यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन गजभिये यांनी दिले. यावेळी अनिल चव्हाण उपशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
जि.प. प्राथ. /माध्य. /उच्च माध्य. शिक्षकांची बिंदुनामावली तयार करणे, उ.श्रे.मुख्या./मा.मुख्या/केंद् र प्रमुख/शिक्षण विस्तार अधिकारी पदांची बिंदूनामावली निश्चित करून पदोन्नती करणे, आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 15%%किंवा कमाल 1500/- प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता 460/- लागू करणे, जि.प.शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती देऊन रिक्त असलेल्या पदांवर शिक्षकांची नियुक्ती करण्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी. शालेय पोषण आहाराचे ऑडिट शाळा स्तरावर न करता तालुकास्तरावर घेण्यात यावे, विद्यार्थ्यांची शालेय गणवेशाची निधी देण्यात यावी, शिक्षकांचे चटोपाध्याय श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करणे, सातव्या वेतन आयोगाचा थकबाकीचा तिसरा हप्ता भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करणे व डीसीपीएस/एन.पी.एस धारकांना रोखीने देणे, शिक्षकांचे स्थायी आदेश, उच्च परीक्षा व कार्योत्तर परीक्षा परवानगी आदेश, मराठी/ हिंदी सुट प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढणे, एन.पी.एस. खाते उघडलेल्या शिक्षकांच्या खात्यावर मागील डी.सी.पी.एस कपात राशी वर्ग करणे , एन.पी.एस. कपातीची राशी त्याच महिन्यात एन.पी.एस. खात्यावर जमा करणे, आदी मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, राजेश गजभिये, दिक्षांत धारगावे, अजय शहारे, आशिष वंजारी, अविनाश गणवीर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.