32.6 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home विदर्भ ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेशिवाय ओबीसींचा विकास नाही-उमेश कोर्राम

ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेशिवाय ओबीसींचा विकास नाही-उमेश कोर्राम

0
22
ओबीसी वसतीगृहाचा प्रश्न 31 आँगस्टपर्यंत न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा
गोंदियात मंडल यात्रेचे उत्साहात स्वागत

गोंदिया,दि.03: ओबीसी समाजाचा सर्वांगीण विकास करुन घेण्ङ्मासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याशिवाय पर्याय नसून ओबीसींनी संघटनेप्रती समर्पित भावना ठेवून काम केल्ङ्मास बळकट संघटन निर्माण होऊ शकतो.त्यासाठी स्व.बी.पी.मंडल यांच्या नावे ओबीसींच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी गठित करण्ङ्मात आलेल्या मंडल आयोगाची माहिती जनसामान्ङ्मापर्यंत व्हावी या उद्देशाने ही मंडल यात्रा असल्याचे विचार मंडल यात्रेचे सयोंजक ओबीसी अधिकार युवा मंचचे उमेश कोर्राम यांनी व्यक्त केले.तसेच ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा प्रश्न येत्या 31 आँगस्टपर्यंत निकाली न काढल्यास सप्टेबंर महिन्यात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला.
ते गोंदिया येथे मंडल यात्रेचे आगमन झाल्यानंतर येथील ‘मयुर लॉन येथे आयोजित मार्गदर्शन सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबलू कटरे होते.तर मंचावर संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे,मुकुंद आडेवार,गोंदिया पंचायत समितीचे उपसभापती निरज उपवंशी,अशोक लंजे,केतन तुरकर,प्रा.सविता बेदरकर उपस्थित होते.प्रास्तविक ओबीसी अधिकार मंचचे सयोजक खेमेंद्र कटरे करुन मंडल यात्रेच्या  आयोजनासंदर्भात पाश्र्वभूमी माडली. blank
तत्पुर्वी यात्रेचे येथील रानी अवंतीबाई चौकात स्वागत करण्यात आल्यानंतर राणी अवंतीबाई यांच्या प्रतिमेला माल्ङ्मार्पण करण्यात आले.त्यानतर ही यात्रा सभागृहात दाखल झाली.कोर्राम पुढे म्हणाले,की ओबीसीं विद्याथ्ङ्र्मासांठी वसतीगृह,निवासी शाळा हव्या या गोष्टी आधीच मंडल आयोगात तरतुद करुन ठेवल्या गेल्या. परंतु काही प्रमाणात मंडल आयोयागाच्या शिफारसी अटीशर्तीच्या आधारावर मंजुर करण्यात आल्या.तेव्हापासून आजपर्यत महाराष्ट्रातील कुठल्याही सरकारने ओबीसी विद्याऱ्थ्याचे वसतीगृहच काय निवासी शाळा सुरु केलेल्या नाहीत.तर २०१७ पासून आम्हाला प्रत्येक सरकार व मंत्री फक्त वसतीगृहाचे आश्वासन देत राहिल्याची टिका केली.blank
यावेळी बोलतांना संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे यानी सर्वसामजाला संघटित होण्याची नितांत गरज असून आज पहिल्यादांचा या मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी राज्यात वेगवेगळे असले तरी केंद्रांत ओबीसी म्हणून एकच आहेत,त्यांनी सोबत येऊन ही यात्रा समाजविकासाच्या मुद्याला घेऊन काढली आहे.समाजाला मंडलआयोग आणि समाजासाठी असलेल्या शासकीय योजनां त्यांच्यापर्यंत  पोचविणे गरजेचे झाले आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमात ओबीसींनी १०० टक्के शिष्ङ्मवृत्ती मिळते परंतु सरकार  देण्यास अात्ता टाळाटाळ करीत असल्ङ्माचे सांगितले. कारण येथील प्रत्येक  व्यवस्था ही आपल्या  समाजाविरोधात आहे.मागासलेल्या घटकाला प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी आरक्षण दिले जात असले तरी आजही न्यायपालिकेत आमचा समाज पोचू न शकल्याने   त्ङ्माठिकाणाहून आपल्ङ्मा विरोधातच सर्वाधिक निर्णय देऊन सविंधानाचीही पायमल्ली होत असल्याचे म्हणाले.
यावेळी बोलतांना मुकुंद आडेवार यानी विदर्भातील सर्वच संघटना ओबीसींच्या मुद्यावर सातत्याने काम करीत आहेत,मात्र मंडल यात्रा ही यावेळी नवा जोश आणि समाजाला देणार असून मंडल कोण होते,त्यांनी समाजासाठी काय केले याची माहिती पटवून देण्ङ्मासाठी पाच-सहा य़ुवकांनी पुढाकार घेऊन सर्व संघटनानासोबत घेऊन काढलेल्या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद ओबीसींमध्ये होत असलेली जनजागृतीचे फलीत असल्याचे विचार माडले.blank

यावेळी निरज उपवंशी,अशोक लंजे यानीही विचार व्यक्त केले.मंडल यात्रेत समाजहितासाठी निघालेल्या उमेश कोर्राम‘,दिनानाथ वाघमारे,मुकुंद आडेवार,धीरज भीसीकर,संजिव भुरे आदींचा ओबीसी अधिकार मंचच्यावतीने शालदेऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना बबलू कटरे यानी मंडल आयोग लागू करण्यात आले,तेव्हा आमच्याच ओबीसी बांधवाना मंडल आयोगाच्याविरोधात तयार करुन येथील उच्चवर्णीयांनी ओबीसींना मंडल विरोधात कमंडल यात्रेत सहभागी करुन घेतल्याने आणि एससी एसटी समाजाप्रती व्देष निर्माण केल्याने ओबीसी आपल्याच अधिकारासाठीच्या मंडल आयोगाला समजू शकला नाही.त्यामुळेच आजही आम्हाला आमच्या हक्क अधिकारासाठी आंदोलनात्मक भूमिका घेण्याची वेळ आली आहे.सरकार नौकèङ्मांचे खासगीकरण करीत असताना आम्ही त्यांचा विरोध केला नाही.२०२0 च्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होऊ घातले असून यातून आपला समाज शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त करीत ओबीसी वसतीगृह असो की निवासी शाळेच्या प्रश्नावर प्रत्येक सरकारने ओबीसीसोबत विश्वासघात केल्याचे विचार त्यांनी व्यक्त करीत या मंडल यात्रेच्या माध्यमातून जनजागृती होऊ लागली आहे.या यात्रेच्या नागपूर येथील ७ आँगस्टच्या  समारोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.संचालन सुनिल पटले यानी तर आभार तिर्थराज उके यानी मानले.आयोजनासाठी  कैलास भेलावे,राजीव ठकरेले,सी.पी.बिसेन,मुकेश शिवहरे,सुनिल तरोणे,शिशिर कटरे,सुनिल भोंगाडे,प्रेमलाल साठवणे,‘महेद्र बिसेन,भुमेश  शेंडे,विनोद चौधरी,सावन कटरे,अतुल सतदेवे,राजेश नागरिकर,रामभगत पाचे,परेश दुरुगकर,किशोर भगत,माधुरी भेलावे,ममता राणे,भारती कटरे,पप्पू पटले,पेमेंद्र चव्हाण,रवी भांडारकर,विनायक येडेवार,हरिष ब्राम्हणकर,रवी अंबुले,गणेश बरडे,रवी पटले,नितीन टेंभरे,संगीता गायधने,अशोक चन्ने,प्रकाश हेमने, चुनेश पटले,प्रमोद बघेले आदींनी सहकार्य केले.