महाविद्यालयीन विद्यार्थीनीली टिप्परने चिरडले

0
11

अमरावती,दि.13-महाविद्यालयातून घरी परतणार्या विद्यार्थीनीला भरधाव वेगाने जाणार्या टिप्परने चिरडल्याने त्या विद्यार्थीनीचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना आज शनिवारला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.ही घटना शहरातील गद्रे चौक ते गांधी चौक दरम्यान घडली.मृत विद्यार्थीनिचे नाव सपना देऊळगावकर(20) असे असून ती सिपना अभियांत्रीकी महाविद्यालयात तृतीय वर्षाला होती.ती प्लेजरने एकवीरा मंगल कार्यालयाजवळून जात असताना विरुध्द दिशेने येणार्या टिप्परने धडक दिली.