
गोंदिया : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये डेंग्यू, स्वाईन फ्लू यासारखे आजार पाय पसरत आहेत. अशात गोंदियात स्क्रब टायफसचा एक रूग्ण आढळून आला आहे. पहीलाच रूग्ण आढळल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून रूग्णावर नागपूर येथील शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहे.गोंदियात स्क्रब टायफसचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभागातएकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील पहिलाच स्क्रब टायफसचा रूग्ण असून तो 50 वर्षाचा आहे. आधी गोंदियातील एका खासगी रूग्णालयात त्याचेवर उपचार करण्यात आल्यानंतर आता नागपूर येथील शासकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. स्क्रब टायफसचा रूग्ण मिळाल्याने आरोग्य विभाग खळबळून जागे झाले आहे. शेतकऱ्यांसह नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.