मुस्लीम शादिखानाचे सहा महिन्यात काम पूर्ण करा- आ.रहांगडाले

0
20

तिरोडा:- मागील पंचवार्षिक कारकिर्दीत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी तिरोडा शहरातील मुस्लीम बांधवाना सामाजीक कार्यासाठी ५५.०० लक्ष शासनाकडून मंजूर करवून २०१८ मध्ये प्रत्यक्षात काम सुरु केले असून आजघडीला शादीखानाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे मागील दोन वर्षापासून कोव्हीड परिस्थितीअभावी सदर बांधकाम पूर्ण होवू शकले नाही आता राज्यात शिंदे-भाजप सरकार येताच तिरोडा नगर परिषद येथे रस्ते विकासकामांकरिता २.५० कोटी मंजूर करवून घेतले असून सदर कामाची निविदा प्रक्रिया सुरु आहे. मुस्लीम बांधवानासुद्धा लवकरात लवकर शादिखाना उपलब्ध होण्याच्या हेतूने आज आमदार महोद्ययांनी शादीखाना येथे प्रत्यक्ष भेट देवून बांधकामाचा आढावा घेतला व येत्या सहा महिन्याच्या आत शादीखाना बांधकाम १००० टक्के पूर्ण करून मुस्लीम बांधवाना हस्तांतरित करण्याचे आदेश न.प. प्रशासनाला दिले यावेळी प्रामुख्याने भाजप शहरअध्यक्ष स्वानंद पारधी,मौलाना मोहम्मद जहूर आलं,वसिम शेख, साकीर अली, न.प.प्रशासन अधिकारी मृत्यंजय कांबळे,कनिष्ठ अभियंता सारंग देशमुख, युनुस शेख, अजीज शेख, कादिर शेख, इजादभाई, अमीन मिस्त्री, जावेश शेख व मुस्लीम बांधव उपस्थित होते.