वाहनाच्या धडकेत बिबट ठार

0
6

गडचिरोली : तालुक्यात मुरखळा गावाजवळ मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली.
मुख्य रस्त्यालगतच्या तलावातील पाणी पिण्यासाठी बिबट मुख्य मार्ग ओलांडून येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट जागीच ठार झाला. बिबट अपघातात मृत्यू झाल्याची मुरखळा, नवेगाव, कनेरी येथील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.