सत्यशोधक विचारधारा जनमाणसांमध्ये पोहोचवून समग्र परिवर्तनाचे साक्षीदार व्हा- पोलीस अधिक्षक भुजबळ

0
27

यवतमाळ,दि.28ः- सत्यशोधक समाज स्थापना दिनाला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठांमध्ये सत्यशोधक समाज स्थापनेचा 150 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये ओबीसीं ची जात निहाय जनगणना झाली पाहिजे या अनुषंगाने श्रावण देवरे यांनी विस्तृत असे विचार याप्रसंगी मांडून ओबीसींच्या जात निहाय जनगणनेचे महत्त्व पटवून दिले. सत्यशोधक विचारधारेतूनच सांस्कृतिक परिवर्तन होऊ शकते अशी भूमिका सत्यशोधक प्रबोधनकार अरविंद माळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडली.
याप्रसंगी सत्यशोधक विशेषांकाचे प्रकाशन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले सत्यशोधक विचारधारा जन माणसांमध्ये पोचवून समग्र परिवर्तन विज्ञानवाद हा निर्माण होऊ शकतो अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी केले‌. भूमिका मायाताई गोरे यांनी मांडली. या कार्यक्रम प्रसंगी सन्माननीय प्रा. काशिनाथ लाहोरे , प्रा. रमेश पिसे , एडवोकेट वासे, प्रा. सुनंदाताई वालदे, सुनीता काळे, दिपक वाघ आदि सहकारी उपस्थित होते. विलास काळे यांनी भारतीय संविधानाची उद्दशिका वाचून कार्यक्रमांमध्ये सर्वांना शपथ घ्यायला लावली. याप्रसंगी कमलताई खंडारे, माधुरी फेडर , सुभाष वानरे , विनोद इंगळे , वासुदेव खेरडे, माळवी काका, अनिता गोरे, वैशाली फुसे, अश्विनी दाहेदार, शोभना कोटंबे, संजय बारी , कल्याणी मादेशवार,शशिकांत फेडर ,माधवी चिंचोलकर, अशोक मोहुर्ले ,भावना गुल्हाने , राजेश गुल्हाने, मंथन गुरनुले, आदि उपस्थित होते. सुंदर सूत्र संचालन नम्रता खडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन नीता दरणे यांनी केले.