बनाथर (कोचेवाही) येथे राष्ट्रीय पोषण अभियान मेळावा

0
33

 गोंदिया,दि.29 :- राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत दि. 28 सप्टेंबरला एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प – गोंदिया 01 अंतर्गत तालुक्यातील बनाथर (कोचेवाही) येथील मरार समाज भवनात पोषण अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात पोषण अभियानाशी संबंधित पोषक आहार प्रदर्शनी , रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. पोषण अभियानाशी संबंधित पोषण गीत तसेच पथनाट्ये ही सेविकांकडून यावेळी सादर करण्यात आले. पोषण आहार प्रदर्शनीमध्ये गावकरी महिलांनी देखील सहभाग नोंदवून आपापल्या घरून पोषक व्यंजन पदार्थ बनवून प्रदर्शनीत ठेवले. पथनाट्याच्या माध्यमातून सेविकांनी अँनेमिया या रक्तातील लोहाच्या अभावामुळे होणाऱ्या आजाराच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करून पोषक आहाराचे जीवनातील महत्त्व तसेच पालकांनी मुलांच्या आहार व आरोग्याबाबत जागरूक राहण्याची आवश्यकता विशद केले. तसेच महिलांना बालकांतील कुपोषण निर्मुलनासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी महिलांना योगाचे प्रशिक्षण ही देण्यात आले. या पोषण अभियान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत बनाथरचे सरपंच गुलाब नागदिवे होते. मेळाव्याचे व पोषक आहार प्रदर्शनी व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन बिरसोला जि.प.क्षेत्राचे सदस्य नेहाताई तुरकर यांनी केले. कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून पांजरा जि.प.क्षेत्राचे सदस्य वैशालीताई पंधरे,ग्रा.पं.बनाथरचे उपसरपंच फागुलाल नागफासे तसेच प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी नरेश सोनटक्के,बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले,विस्तार अधिकारी तिर्थराज ते. उके, प्राथमिक आरोग्य केंद्र-काटीचे वैद्यकीय अधिकारी डाँ. अमर खोब्रागडे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रा.पं.चंगेराचे सरपंच लालसिंग पंधरे,ग्रा.पं. कोचेवाहीचे सरपंच दिपिका बिसेन, जि.प.शाळा जगनटोलाचे मुख्याध्यापक मिश्रा, ग्रा.पं. वडेगांव प्रमिला पाचे, ग्रा.पं. बनाथर सदस्य सुनैना कछुवाह,सागन बिसेन, मिथेश्वरी सिंगनधुपे,माजी सरपंच मोतनबाई बर्वे, कोचेवाहीचे उपसरपंच सोविंद नागफासे,सदस्य रंजिता खडसे, योग शिक्षिका सौ. तुरकर, सीएचओ शंशांक शेंडे,अंगणवाडी पर्यवेक्षिका ऊषा आगाशे,लता उईके तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी,बनाथर बीट क्षेत्रातील विविध गावांचे सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य,सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सतोना अंगणवाडी सेविका चंद्रकांताबाई बारमाटे यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्तावना पर्यवेक्षिका रमा बोरकर यानी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन धामनगांव अंगणवाडी सेविका प्रेमलताताई तेलासे,वडेगांव अंगणवाडी सेविका शकुंतला गोंडाणे यांनी मानले.