अन् भव्य दिव्य तोंडगाव फाटा येथील टोलनाका जमिनदोस्त; सुदैवाने जिवितहानी टळली

0
32

 वाशीम-: सुसाट वेगात हवा सुटली अन् क्षणात भव्यदिव्य स्वरूपातील टोलनाका जमिनदोस्त झाला.ही घटना शहरानजिकच्या वाशिम-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगाव नजिक आज, ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यावेळी टोलनाक्या नजिक एकही वाहन उभे नव्हते. त्यामुळे जिवितहानी टळली. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. असे असताना आज दुपारच्या सुमारास सुसाट वेगात हवा सुटल्यानंतर हा टोलनाका काही कळण्याच्या आत जमिनदोस्त झाला.यावरून हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले, याची प्रचिती आली आहे.