शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन:- जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर

0
19

देवरी,दि.01ः- तालुक्यातील जि.प.डिजिटल प्राथमिक शाळा भागी/देवरी येथे नविन वर्गखोलीच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.सदर भुमिपुजन सोहळा जि.प.उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रिडा व शिक्षण समिती इंजि.यशवंत गणविर यांचे शुभहस्ते,महिला व बालकल्याण सभापती  यांच्या प्रमुख उपस्थितीत,जि.प.सदस्या कल्पनाताई वालोदे, सामाजिक कार्यकर्ते नितेशजी वालोदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर धरमशहारे,इंजि.कापसे,सरपंच मनोहर राउत, शाळा समितीचे अध्यक्ष दिलीप डुंभरे,तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,गावकरी उपस्थित होते.
शिक्षण हे मनुष्याच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे व शाळा हे विद्येचे मंदिर आहे.आपल्या अध्यापनातुन, दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थ्यी घडवा.पाठ्यक्रमासोबत सामाजिक, राजकीय,आर्थिक, भौगोलिक ज्ञानाचे धडे देण्याचे उपाध्यक्ष महोदयांनी शिक्षकांना आवाहन केले