
तिरोडा : शासकीय जागेवर अतिक्रमण करणे व मुदतीत घर टॅक्स न भरणे तालुक्यातील ग्राम परसवाडा येथील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याला चांगलेच भोवले. त्यासाठी त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले.
सविस्तर असे की, परसवाडा येथील ग्रामपंचायतचे उपसंरपच राकेश अंबादास वैघे व त्यांच्या कुटुंबाने घराच्या कराचा मुदतीत भरना केला नाही. तसेच त्यांचे वडील अंबादास वैघे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले. त्यांच्या या गैरकारभारविरुद्ध सरंपच मनिराम हिंगे यांनी २७ मे २० व ३० ऑक्टोबर १९ रोजी नियमानुसार पाहणी केली. त्यात तीन महिन्यांच्या आत कराचा करणे आवश्यक होते, पण त्यांनी भरले नाही.
परसवाडा येथील शासकीय जमीन गट क्र. 795 क्षेत्र ०-१२ हे.आर. जागेवर १९९९-२००० पासून २०११-१२ पर्यंतचा कालावधी अतिक्रमण पंजीला नोंद आहे. सदर जमीन शासनाच्या मालकीची असल्याचे दिसून येते. परसवाड्याचे तलाठी यांच्या अहवालानुसार, अतिक्रमण केले असल्याचे स्पष्ट झाले. या विरुद्ध ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (१) (ह) व कलम (१४) (१) (ज.३) नुसार आदेश पारित करण्यात आले.
तसेच सदस्य मोहनलाल दादू तितिरमारे यांनी सुद्धा घर टॅक्स भरणा वेळेवर केला नाही. त्यांच्या आई बकुबाई दादू तितिरमारे यांच्या नावाने घर क्र.५;६;2 असून त्या घरात मोहनलाल दादु राहतात. संयुक्त कुंटुब राहत असल्याने सदस्य पद गेले. पण सदर सदस्याचे दीड महिने बाकी राहिले होते. कार्यकाळ संपत असताना त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.