आरटीई फाउंडेशन इंडिया जिल्हा गोंदिया जिल्हा कार्यकारिणीची सभा संपन्न

0
13

गोंदिया,01:-येथील शारदा इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया येथे आरटीई गोंदिया जिल्हा कार्यकारिणीची सभा आरटीई फाउंडेशन इंडिया जिल्हा अध्यक्ष प्रा. आर. डी. कटरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.तसेच प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा सचिव सुनील आवळे, जिल्हा उपाध्यक्ष योगिता बिसेन, जिल्हा सहसचिव खलील खान पठाण,वाय.टी.कटरे,जिल्हा मार्गदर्शक डॉ. नीरज कटकवार हे उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा सचिव सुनिल आवळे यांनी केले. उपरोक्त सभेत संस्था चालकांनी आपल्या समस्या जिल्हा सचिव प्रा. आर. डी. कटरे यांच्या समक्ष मांडल्या. सभामध्ये खाजगी कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्य शाळेची वंचित व दुर्बल घटकातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शिल्लक असलेल्या शैक्षणिक शुल्कवर चर्चा करण्यात आली. तसेच जुन्या शाळेतून टीसी न घेऊन जाता दुसर्‍या शाळेत कसे प्रवेश दिले जाते याचे समाधानकारक मार्ग कसे काढता येईल यावर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी यांनी पालकांकरिता टीसी काढण्याची एक ठराविक कालावधी निश्चित करून जुन्या शाळेची शिल्लक असलेल शुल्क जमा केल्यानंतर टीसी पालकांना देण्यात यावी, यावर विचार करण्यात आले. तसेच सत्र 2012-13 ते 2021-22 पर्यंतचे प्रलंबित आरटीईची प्रतिपूर्ति शाळांना लवकरात लवकर प्रदान करण्यात यावे.जर प्रतिपूर्ति देण्यात आली नाही तर गोंदिया जिल्ह्य़ातील सत्र 2023-24 चे आरटीईचे प्रवेश घेतले जाणार नाही असा प्रस्ताव सभेत पारित करण्यात आला. सभा अध्यक्ष प्रा. आर. डी. कटरे जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये खाजगी शाळेला असलेल्या समस्या व त्याचे निराकरण आरटीई फाउंडेशन द्वारे नक्कीच पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाईल याची हमी दिली. त्याचप्रमाणे आरटीई बद्दल असलेल्या अडचणी संस्था संचालकांना सांगितले. व आरटीई फाउंडेशनच्या कार्याची जाणीव त्यांनी करून दिली. सभेला आरटीई फाउंडेशन जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी तसेच गोंदिया जिल्ह्याचे खाजगी शाळेचे संस्था संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य खुशाल कटरे तर आभार प्रफुल्ल भालेराव यांनी मानले.