38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ मुंडीपार बसस्थानकासमोरील खड्डे श्रमदानातून बुजविले

मुंडीपार बसस्थानकासमोरील खड्डे श्रमदानातून बुजविले

0
35

blank

 गोरेगाव,दि.02ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयतीचे औचित साधत राधाकृष्ण भजन मंडळ मुंडीपारच्या पुढाकाराने गोंदिया ते कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपार गावानजीक पडलेले खड्डे श्रमदानातून बुझविण्यात आले.येथील
बसस्थानकासमोर अतिवृष्टीच्या पावसामुळे व निकृष्ट डांबरीकरणामुळे रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून खड्डे पडले होते.त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.सदर मार्गावर सध्या नवरात्री पर्वामुळे अधिक प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहनचालकांचा त्रास बघून आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्यसाधत हे खड्डे बुजविण्यात आले.यावेळी सरपंच सुमेंद्र धमगाये , उपसरपंच जावेद (राजा) खान , गिरीश पारधी (अध्यक्ष त. मु. स), अरविंद साखरे ग्रामसेवक, नामदेव जी नेवारे, रोहित पांडे , उमेंद्र ठाकुर, शिवा बिसेन , अंकुश बोमले, राहुल राऊत , सोनू शेंडे, सुनील वाघाडे, अजय नेवारे, आकाश ठाकरे, जोगेश्वर गमधरे, कुमार मेश्राम,रमेश श्रीभद्रे व सर्व सदस्य गण तसेच, ग्राम पंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी, शिक्षक वृद्ध जिल्हा परिषद शाळा, सर्व सेविका,आशासेविका, अध्यक्ष महिला बचत गट माधुरीताई बोमले आदी उपस्थित होते.blank

ग्राम पंचायत कार्यालय मुंडीपार येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात
सरपंच सुमेंद्र धमगाये यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेस व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. २ ऑक्टोबरला भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 153 वी जयंती साजरी करण्यात आली.देशातील दुसरे प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांची 119 वी जयंती साजरी करण्यात आली.राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म एकाच दिवशी झालेला होता.

blank