जायस्वाल महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहाचे आयोजन

0
15

अर्जुनी-मोरगाव : स्थानिक एस एस जायस्वाल महाविद्यालयात दिनांक 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत साजरा होत असलेल्या जागतिक वन्यजीव सप्ताहाचे उदघाटकीय कार्यक्रम पार पडले.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील आय क्यू ए सी विभागाचे समन्वयक डॉक्टर के जे सीबी असून मार्गदर्शक ग्रंथपाल प्राध्यापक अजय राऊत होते. प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ एम आर दर्वे यांनी मांडले. प्रास्ताविक भाषणातून डॉक्टर दरवे यांनी वन्यजीव आणि मानव यांच्यात होत असलेल्या संघर्षाचे उदाहरण देत हे संघर्ष कशाप्रकारे कमी करता येईल, याबाबत मार्गदर्शन करीत कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली.

मार्गदर्शक प्राध्यापक अजय राऊत यांनी वन्यजीव सप्ताह निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने ‘सेव बर्ड सेव नेशन’ या विषयावर मार्गदर्शन करीत वन्यजीव सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय भाषणातून डॉ.के.जे. सीबी यांनी वन्यजीव-मानव आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयातील बीएससी तीन ची विद्यार्थिनी मयुरी गौतम हिने केले. आभार भूगोल विभागातील प्राध्यापक राजेश डोंगरवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी भूगोल विभाग प्रमुख डॉ.एम.आर. दर्वे, प्राध्यापक राजेश डोंगरवार आणि भूगोल विभागातील दुष्यंत सूर्यवंशी, श्रद्धा कुंबरे, तुषार नाकाडे, अजित ठलाल या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.