एकता मंचाचा मेळावा व जिल्हा कार्यकारणी सभा संपन्न

0
27

एकता मंचच्या जिल्हाध्यक्षपदी बी. एस. केसाळे यांची बिनविरोध निवड.

गोंदिया- विजयादशमीचे औचित्य साधून  गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणावरून आलेल्या व कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी बांधवांची बैठक विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी एल एन कुटे यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धा पब्लिक स्कूल, आमगाव येथे पार पडली.
बाहेर जिल्ह्यातील हजारो अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, वन विभाग, महसूल विभागांमध्ये मागील साधारणतः वीस वर्षापासून सेवा देत आहेत. काही अधिकारी व कर्मचारी बांधव तर पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा अशा शेकडो किलोमीटर वरून या ठिकाणी कार्य करत आहेत.
आपल्या गावापासूनचे अंतर अगदी दूर असल्यामुळे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे एखादे एकत्र येण्यासाठी व्यासपीठ असावे या संकल्पनेतून एकता मंच गोंदिया जिल्हा या नावाचा असा मंच यावेळी तयार करण्यात आला.
या एकता मंचाच्या जिल्हाध्यक्षपदी बी.एस.केसाळे यांची बिनविरोनिवड करण्यात आली व सचिव पदी मयूर राठोड , कार्याध्यक्षपदी शरद बोंद्रे, उपाध्यक्ष कैलास हांडगे, सदाशिव पाटील, आशिष चौरे,तर जिल्हाप्रमुख मार्गदर्शक पदी लक्ष्मण आंधळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी चर्चेदरम्यान इतर आमच्या माध्यमातून विविध थोर महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करणे.विविध विभागांमध्ये उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, परीक्षांमध्ये चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे.दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करणे.त्यांना प्रोत्साहन देणे देश सेवेसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे अशा प्रकारचे अनेक उपक्रम एकता मंच गोंदियाच्या वतीने राबवण्याचे या सभेमध्ये ठरवण्यात आले.
यावेळी संजय गोडसे, (श्रद्धा पब्लिक स्कूल डायरेक्टर), दिलीप होटे , जी एस ठुले, एम पी मॅकलवार, एन. ए.तिडके , नीलकंठ किणीकर, विठ्ठल सांगळे, बी एन सरगर , व्ही एफ राठोड, एम डी फड , राम सोनटक्के, एस डी जाधव , सुरज राठोड, सतीश बिट्टे ,एम व्ही बडे , सुरेश मुधोळकर इ.जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यातून एकता मंचाच्या मेळाव्याला उपस्थित झाल्याबद्दल सर्व अधिकारी कर्मचारी यांचे खूप खूप आभार एकता मंचाच्या वतीने करण्यात आले