
गोंदिया, दि. 09: जिल्हा नियोजन समितीची सभा मंत्री, वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, गोंदिया जिल्हा सुधीर मुनगंटीवार यांचे अध्यक्षतेखाली सोमवार 10 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 02 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आयोजित केलेली आहे.
सभेची विषय सुची खालील प्रमाणे आहे. जिल्हा नियोजन समिती सभा 30 एप्रिल 2022 च्या इतिवृत्तास मंजूरी देणे. जिल्हा नियोजन समिती सभा 30 एप्रिल 2022 च्या इतिवृत्तातील कार्यवाही मुद्यांचा आढावा घेणे. 01 एप्रिल 2023 पासून विविध योजनांकरीता देण्यात आलेल्या प्रशासकिय मान्यतांचे पुनर्विलोकन करून मान्यता देणे. जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत नियोजनाचा आढावा घेणे. (सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र) व अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय. या सभेस सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी अद्ययावत माहितीसह नियोजित वेळेपूर्वी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.