संविधानविरोधी शिंदे फडणविस सरकारवर, मविआसह महात्मा फुले समता परीषदेचा हल्लाबोल आंदोलन!

0
20

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी विद्यार्थी व सर्वपक्षीयांचे आंदोलन!
मुख्यमंत्र्यांना पाठविले मागण्याचे निवेदन!

वर्धा,दि.10ः- लोकशाही व संविधानाचा गळा घोटुन, कपटीपणाने षडयंत्र रचुन, भाजपचे देवेंद्र फडणविसांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडुन, खोकेबाज शिंदे फडणविस सरकार स्थापन केले. पण आल्या आल्या या सरकारने भुलथापा मारत, केवळ दोन पक्षाची लढाई,देवदेवतांचे दर्शन आणि धर्मांधता यातच सरकारला गुंतवून ठेवले. यात कमी पडली म्हणुन, केंद्र सरकारपुढे मिंधे होवुन महाराष्ट्र हिताचा वेदांतसारखा,महा उद्योग गुजरातच्या चरणी अर्पण केला.यात अजुन काही कमी होती म्हणुन,सामान्य जनतेचा छळवाद करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या, जनहितकारी योजना बरखास्त करण्याचा सपाटा या सरकारने सूरू केला. त्याची सर्वात मोठी झळ ही ओबीसी विद्यार्थी,शेतकरी आणि महिला सक्षमिकरणाला बसलेली आहे. म्हणुन महात्मा फुले समता परीषदेच्या या आंदोलनाला काॅंग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने पाठींबा देवुन आंदोलनात सहभाग नोंदविला.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षापुर्वी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. या संस्थेला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८२४ कोटी रूपये निधी दिला. त्यातुन ओबीसी विद्यार्थ्यांच्या अनेक हिताच्या योजना
राबविल्या. पण राज्यात सतांतर झाल्यावर मात्र भाजपचे ओबीसी मंत्री अतुल सावे,यांनी महाज्योतीमधील या सर्व योजना बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे.महाज्योतीने गरीब ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जेईई निट आॅनलाईन प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब देण्याची योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातील दहा हजार व वर्धा जिल्ह्यातील ८९० विद्यार्थ्यांना हे टॅब वाटायचे होते. ते सर्व टॅब महाज्योतीच्या कार्यालयात पडुन आहेत, पण भाजपचे ओबीसी मंत्री यांनी विद्यार्थ्यांना टॅब वाटण्यास मनाई आदेश दिलेला आहे.
तर महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सुध्दा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे नाहीत.तसेच स्वाधार सारखी शासनाची पर्यायी योजनाही नाही. त्यामुळे ओबीसींच्या गरीब पण गुणवंत विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात चांगल्या संस्थांमधे प्रवेश मिळवूनही, वसतीगृहाअभावी त्यांना परत यावे लागते. म्हणुन महाज्योतीने स्व निधीमधुन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना प्रस्तावित करून, बाहेर गावी शिकणार्‍या विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ८० हजार रूपये,आधार निधी देण्याची योजना होती. परंतु सतांतर झाल्याबरोबर भाजप मंत्र्यांनी हीओबीसी विद्यार्थ्यांच्या क्रांतीकारी शिक्षणाची योजनाच रद्द केली.
महाज्योतीने परदेशी शिक्षण घेणार्‍या १०० ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना सूरू केली होती. ती सुध्दा रद्द करण्यात आली.त्यामुळे या अन्यायाविरूध्द आंदोलन करण्यात आले.
शैतककर्‍यांना घोषणा करूनही, अतिवृष्टीची रक्कम मिळाली नाही. बाजार समित्यामधे शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देवु अशी पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत घोषणा देणार्‍या खोकेबाज सरकारने मात्र शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार न देताच बाजार समित्याच्या निवडणुका जाहीर केल्यात. अशा फोलकट सरकारचा या आंदोलनात निषेध करण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते,मा. सुरेशभाऊ देशमुख, प्रा. दिवाकर गमे,सुनिल राऊत राष्ट्रवादी काॅंग्रेस, मनोज चांदुरकर काॅंग्रेस अध्यक्ष,बाळाभाऊ मिरापुरकर, शिवसेनाशहर अध्यक्ष,निळकंठ पिसे, जिल्हा अध्यक्ष,सुधीरभाऊ पांगुळ,अर्चनाताई भोमले,महेंद्र शिंदे,कविता मुंगळे,धर्मपाल ताकसांडे,अविनाश सेलुकर,बाळाभाऊ माऊस्कर,ज्योतीताई देशमुख, प्रा. जगदीश जुनगरी विनय डहाके,विशाल हजारे,यांची घणाघाती भाषणे होवुन, त्यांनी शिंदे फडणविस सरकारचे वाभाडे काढले.
त्यानंतर मा. जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्फत मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले. या आंदोलनात,माधुरी देशमुख,किरण कडु,किशोर तितरे,जयंत मानकर,राजु देवढे,मिलींद हिवलेकर,प्रभाकर धोटे,विनायक बोंडे,महेश जमधने,कवडु बुरंगे,संजय शिंदे,कुणाल बावणे,संदिप भांडवलकर,गजानन नरड,विनोद मुडे,सुजाता जांभुळकर,निता गजबे,संदिप शिंदे.निळकंठ राऊत, भरत चौधरी,व महिला विद्यार्थी व समता परीषदेचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते,