वैद्यकीय महाविद्यालय बांधकामाला सुरवात..माजी आ.जैन यांनी केली पाहणी

0
55

गोंदिया,दि.11ः– येथील शासकीय वैद्वैयकीय महाविद्यालयाच्या (medical college ) ईमारत व विविध कामांना
तत्कालीन सरकारच्या काळात मंजुरी प्राप्त झाली होती. बऱ्याच कामांच्या निविदा मंजूर होऊन सदर,निविदा केंद्रीय एजेंसी च्या ७ जुलै २०२२ च्या शासन निर्णयानुसार इंजिनीरिंगरिं प्रोजेक्ट (इंडिया) लि.यांना टर्न कि बेसेसवर आधारावर बांधकाम करण्याकरिता नेमणूक करण्यात आली.
शासकीय वैद्वैयकीय महाविद्यालयाच्या १५० विध्यार्थी (medical college ) क्षमता व ६५० रुग्ण खाटांकरीता २७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार ६८९.४६ कोटीची प्रशाकीय मान्यता मिळालेली आहे. २२ जानेवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार, इंजिनीरिंगरिं प्रोजेक्ट (इंडिया) लि. व आयुक्त वैद्यकीय (medical college ) शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आला.
त्याचाच एक भाग म्हणून संरक्षण भिंतीच्या बांधकामाला सुरुवात झाली असून आज मंगळवार 11 ऑक्टोबर रोजी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कामाची पाहणी केली. वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे व सामान्य माणसाला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल सातत्याने प्रयत्नरत असल्याचे जैन यांनी सांगितले. आज जैन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेवर आवारभिंतीचे सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष (medical college ) पाहणी केली. गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाची ईमारतही लवकर साकारण्यात यावी यासाठी प्रफुल पटेल व शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. पाहणी दरम्यान बाळकृष्ण पटले, रमेश गौतम, अखिलेश सेठ, केतन तुरकर,पन्नालाल डहारे, संतोष लिल्हारे, शैलेश वासनिक, संजय उईके, पप्पू बिनझाडे,निलेश उईके, निलू मानकर, सौरभ मिश्रा, लेखन बहेलिया उपस्थित होते.