जलसंधारण कार्यालयात जलशक्ति केंद्राची स्थापना

0
32

गोंदिया,दि.13 जलशक्ती मंत्रालय, जल संसाधन, नदी विकास, गंगा संरक्षण विभाग भारत सरकार आणि मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या  जलशक्ती अभियानाच्या गोंदिया येथील जलशक्ती केंद्राचे उद्घाटन आज 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदं व जलसंधारण विभाग, यांचे कार्यालयात.  जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल पुंड,जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, सर्व जलसंधारण अधिकारी व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

            जलशक्ती अभियानाअंतर्गत नविन कृत्रिमरित्या पुर्नभरण बांधकामे तयार करणे, अस्तित्वातील तलावांचे जलस्त्रोतांचे पुर्नजीवन करणे,पावसाळ्यापूर्वी नद्यांचे पुर्नजीवन करणे, सर्व जलाशयांची जिओटॅगींग प्रगणना करणे आणि आवश्यकतेनूसार नविन कामे घेण्यासाठी वरील सर्व माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय जलसंधारण योजना तयार करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करण्यात येणार आहे.

            महत्वाचे म्हणजे या अभियानामुळे भूगर्भातील पाण्याची साठवणूक वाढविण्यास मदत होणार आहे. तसेच जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यास हातभार लागणार आहे. या कार्यक्रम अंतर्गत तांत्रिक माहिती व जनसंपर्क करिता श्री तुषार मानकर 9028192437 यांना संपर्क करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.