धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदी करा

0
71

गोंदिया,दि.13 शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदी करिता NeML पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करिता जिल्ह्यातील सर्व धान उत्पादन शेतकऱ्यांनी तालुक्यातील  नजीकच्या आधारभूत धाना खरेदी केंद्रावर स्वत:चे प्रत्यक्ष Live Photo अपलोड करून चालु हंगामाचे 7/12  उतारा,अधाराकार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करून दिनांक 21.10.2022 पर्यंत खरीप हंगामातील धान खरेदी करिता ऑनलाईन नोंदी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.

          तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी जनधन योजनेचे खाते, संयुक्त बँक खाते नोंदणी करताना देवु नये असे आवाहन करण्यात येते.