
गोंदिया १६ ऑक्टोबर: शहरातील शास्त्री वार्ड परिसरातील रस्ते व नाल्यांची दुरावस्था झाली आहे. परिणामी तिथे राहणार्या नागरिकांना आवागमन करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांची व नाल्यांची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीला घेवून युवा बहुजन मंचच्या वतीने मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात होते.त्या निवेदनाची दखल न घेतल्यास मुंडण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याने आज १६ ऑक्टोबर रोजी मुंडण आंदोलन करण्यात आले.यावेळी बहुजन युवा मंचचे सुनिल भोंगाडे,रवी भांडारकर,संजु यादव,संजु भांडारकर, प्रकाश,जलील,कालु यादव,सोनु गजभीये,राजु नेवारे आदींनी मुंडण होत नगरपरिषद प्रशासनाचा निषेध नोंदवला.आंदोलनात प्रेम जायस्वाल,जी.आय.उरकुडे,डॅा.रुपसेन बघेले,राध्येश्याम कुुरंजेकर,अशोक चुटे,केशरीचंद बिसेन,वर्षा राठोड,कमलाबाई कुुरंजेकर,प्रेमलाल साठवणे,कैलाश भेलावे, सोनु पारधी,रामकृष्णा गौतम, मुकेश खोबरागडे,इकबाल खान,अनिल लोणारे,पप्पू मुनेश्वर,संजय जायस्वाल आदी परिसरातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
शहरातील शास्त्री वॉर्डातील केएमजे हॉस्पिटल व यूनाईटेड हॉस्पिटल समोरील व सभोवतालच्या सांडपाणी वाहत असलेल्या नाल्या पूर्णत: केरकचरा व मलब्याने भरलेल्या आहेत. यामुळे दूषित पाणी व पावसाचे पाणी नेहमिच रस्त्यावर वाहत असते व ते साचुन घाण चिखल झालेला आहे. या साचलेल्या घाणीमुळे येण्याजाण्याला त्रास तर आहेच. पण, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. योग्य नियोजन न केल्यामुळे केएमजे हॉस्पिटल, यूनाइटेड हॉस्पिटल व परिसरातील अन्य रिहायशी इमारतीमुळे परिसर केरकचरा व मलब्याने भरलेला राहतो आणि सांडपाणी वाहून नेणार्या नाल्या अरुंद्ध होतात. शास्त्री वॉर्ड परिसरातील रस्ते व नाल्यांची येत्या दहा दिवसात दखल न घेतल्यास न झाल्यास युवा बहूजन मंच व वॉर्ड परिसरातील नागरिक हे खासदार- आमदार, माजी नगरसेवक, नगर परिषद शासन प्रशासनाच्या नावाने मुंडन कार्यक्रम घेण्यास बाध्य राहतील, असा इशारा दिला होता. त्या अनुषगाने आज १६ ऑक्टोबर रोजी मुंडण आंदोलन करण्यात आले.