मगाराग्रारोहयोंतर्गत ग्रामरोजगार सेवकांचे तीन दिवसीय ग्राम समृध्दी प्रशिक्षण

0
31

गोरेगांव:-तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण औध्योगिक प्रशिक्षण संस्था(ITI) गोरेगांव येथे आयोजित करण्यात आले होते.‘मी समृद्ध तर, गाव समृद्ध’ असे या बजेटचे ब्रिद वाक्य आहे. त्यानुसार रोजगार हमी योजनेचा दशवार्षिक नियोजन आराखडा तयार केला जाणार आहे.रोजगार हमीचे समृद्धी बजेट कसे असेल, हे ग्रामरोजगार सेवकांना कळावे, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय ग्रामरोजगार सेवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या नव्या संकल्पनेबाबतचा आदेश रोजगार हमी योजना विभागाचे अप्पर आयुक्त नंदकुमार यांनी दिला आहे.
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध’ होईल या धोरणांतर्गत कुटुबांना लखपती कुटुंब बनविता येईल .यामुळे रोजगार हमी योजनेचे बजेट हे खऱ्याअर्थाने समृद्धी बजेट बनू शकेल, नव्या संकल्पनेचा मुख्य उद्देश समृद्धी बजेटमध्ये प्रत्येक मातीच्या कणातून अधिक पैसा व प्रत्येक पाण्याच्या थेंबातून अधिक पैसा, मागेल त्याला काम, पाहिजे ते काम, गाव समृद्धीवरून कुटुंब समृद्धी असे आमूलाग्र बदल होऊ शकणार आहेत.रोजगार सेवक या योजनेचा कणा आहे म्हणुन ग्रामरोजगार सेवकांचे प्रशिक्षण घेऊन गावातील प्रत्येक कुटुंबांना समृध्द व लखपती बनविता येईल तसेच त्यांचे राहणीमान पण सुधारेल.
समृध्द बनविण्यासाठी प्रत्येक कुटुंबांना गृहभेटी देऊन त्यांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनात नाव देण्यापासुन सदर योजनेचा लाभ देऊन रोजगार उपल्बध करुन त्यांची आर्थीक परिस्थीती सुधरवणे हे या योजनेचे ध्येय आहे. गावफेरी,शिवारफेरी करुन गावात कोणकोणत्या कामाची गरज आहे ते लक्षात घेऊन दशवार्षिक समृध्दी नियोजनात घेणे व कामे करुन जास्तीत जास्त मनुष्यदिवस निर्माण होतील तरच गाव समृध्द होईल व गावातील प्रत्येक कुटुंब सुद्धा समृध्द होईल. रोजगार हमी विभागाने यासाठी एक स्वतंत्र प्रारूप (मॉडेल) तयार केले आहे. यामुळे शेतमजूर आणि पर्यायाने गावे समृद्ध होण्यास मदत होईल, हा या नव्या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश.
प्रशिक्षक म्हणून प्रशांत कोलटकर सहाय्यक कार्यक्रमाधिकारी मोरगाव अर्जुनी व राकेश बघेले  सीएफपी समन्वयक तिरोडा यांनी तीन दिवस ग्रामरोजगार सेवकांना प्रशिक्षण दिले.सदर प्रशिक्षणाला तहसीलदार सचिन गोसावी,गटविकास अधिकारी अजितसिंग पवार ,विस्तार अधिकारी टी.डी.बिसेन ,विस्तार अधिकारी बोरकर ,सहायक कार्यक्रम अधिकारी(तहसील) हरेस कटरे , सहायक कार्यक्रम अधिकारी (पं.स.)स्वप्ना ठलाल यांनी मार्गदर्शन केले.