घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी उर्वरित निधी मिळेल, आमदार फुके यांच्या प्रयत्नांना यश

0
27

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील हजारो घरकुल लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा…

गोंदिया/भंडारा.-गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नगरपरिषद व नगर पंचायत अंतर्गत असे हजारो लाभार्थी असून ते प्रधानमंत्री आवास योजनेचा उर्वरित निधी मिळण्यापासून वंचित आहेत. मागील महाविकास आघाडी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे हा निधी प्रलंबित असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक माणसाला आपले घर बनविण्याच्या संकल्पाचे स्वप्न भंग करण्यासाठी माविआच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले.

गरजू सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी राज्यात शिंदे-फडणवीस यांचे लोकाभिमुख सरकार येताच प्रत्येक माणसाच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार डॉ.परिणय फुके तर सरकारच्या दरबारी तक्रार घेऊन हजर आहेत.

आमदार डॉ.परिणय फुके यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती.ते म्हणाले, गरिबांना त्यांच्या स्वप्नातील घरापासून दूर ठेवण्याचे काम मागील सरकारने केले. आता दीपावली डोक्यावर असली तरी घरकुल योजनाच्या निधी न मिळाल्याने दिवाळी अपूर्ण आहे. त्यांची दिवाळी आनंदाची जावी, यासाठी आमच्या सरकारने गृहनिर्माण योजनेची रखडलेली रक्कम देऊन त्यांना न्याय दिला पाहिजे.

आमदार फुके यांच्या या गंभीर मागणीची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी उर्वरित रक्कम वाटप करण्याचे निर्देश संबंधित म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले.

फुके म्हणाले, राज्यात स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेचे सरकार आहे. जे पाप मागील सरकारने राज्यातील जनतेला अनेक योजनांमधून आणि लाभांपासून नाकारले होते, ते सरकार पुन्हा सुरू करून राज्याला समृद्ध आणि विकासशील करेल.

आमदार श्री.फुके म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार सर्व नगरपरिषदा व नगर पंचायतींना २४ तासांत निधी देण्याचे आश्वासन म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. हा निधी जमा न केल्यास मुंबईत आंदोलनाची भूमिका घेतली जाईल असे स्पष्ठ संकेत दिले आहे.