पवन बनसोड यवतमाळचे नवे पोलीस अधीक्षक

0
10

 यवतमाळ-येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांची गुरुवारी बदली केल्यानंतर गृह विभागाने १२ तासांतच आपला आदेश फिरवला. गुरुवारी महाराष्ट्र पोलीस अकादमीचे अधीक्षक गौरव सिंह यांची यवतमाळच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरा पवन बनसोड यांच्या नावाचे आदेश निघाले. गृह विभागाने यवतमाळ पोलीस अधीक्षक पदासाठी एका दिवसात तीन आदेश काढल्याने या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा आहे.यवतमाळ येथे नियुक्ती करण्यात आलेले पवन बनसोड यांची गृह विभागाने गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण येथून सिंधुदुर्ग येथे बदली झाली होती. शुक्रवारी रात्री नव्याने काढलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्ग येथून यवतमाळ येथे बदली करण्यात आली. दरम्यान शुक्रवारी दुपारी अपर पोलीस महासंचालकांनी तातडीचे आदेश काढून पुढील आदेशापर्यंत डॉ. दिलीप पाटील भुजबळ हेच यवतमाळचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळतील असे स्पष्ट केले होते. त्यानंतर रात्री नव्याने आदेश निघाल्याने पोलीस वर्तुळात विविध चर्चा आहे.