धुंदाटोला/मोहगाव(बु.) येथे एक दिवस बळीराजासाठी कार्यक्रम उत्साहात

0
24

गोरेगाव,दि.03ः- तालुक्यातील धुंदाटोला /मोहगाव( बु.) येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत  विभागीय कृषी सहसंचालक नागपूर आर.डी.साबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली.चर्चेदरम्यान गावातील शेतकऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.यामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास ,24 तास विद्युत प्रवाह, सिंचनाची सोय, तारेचे कुंपण, महाडीबीटी वरील समस्या, कृषी अभियांत्रिकीकरण,पीक पद्धती, शेतीपूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय ,शेळीपालन, कुक्कुटपालन, हरभरा प्रमाणित बियाणे परमिट वाटप, पीक फेरपालट, इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.विभागीय कृषी सहसंचालक यांनी शेतकऱ्यांना नवीन पीक पद्धती विषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.तसेच स्मार्ट प्रकल्प अंतर्गत पीक प्रात्यक्षिकाची पाहणी महेंद्र फतू पिल्लारे व कुवरलाल राऊत यांच्या शेतात करण्यात आली.सदर कार्यक्रमाला प्रज्ञा गोडघाटे,तुमडाम,  गोरेगाव तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाटोळे,कावेरी साळे,सचिन कुंभार,मंडळ कृषी अधिकारी आघाव,मंडळ कृषी अधिकारी करंजेकर,गोरेगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष कमलेश रहांगडाले,संचालक हरीष कटरे,प्रगतिशील शेतकरी मनीराम पटले,भुसनराव जयतवार,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गजानन पटले,सर्व कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कृषी सहायक देवेंद्र पारधी यांनी मानले.