
अध्यक्ष खा. अशोक नेते घेणार आढावा
गोंदिया, दि. 04 : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक सोमवार 07 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीची विषय सूची खालीलप्रमाणे आहे. मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना (सर्वांसाठी घरे शहरी), प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिचाई योजना, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन मिशन, राष्ट्रीय वारसा शहरी विकास आणि संवर्धन योजना, अटल नविनिकरण शहर परिवर्तन योजना, स्मार्ट शहर अभियान, उज्ज्वल डिस्कॉम इंशोरन्स योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जल मार्ग विकास प्रकल्प, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना व डिजिटल योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.
उपरोक्त योजनाव्यतिरिक्त ग्रामीण विकास मंत्रालयाकडून पुरस्कृत अन्य योजना, केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता, पंचायत राज कार्यक्रम, आदिवासी विकास व ग्रामीण विद्युतीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, डाक विभाग, बीएसएनएल व वन विभागाच्या योजनांचा आढावा सुद्धा या बैठकीत घेण्यात येणार आहे. मागील बैठकीत आपल्या विभागाशी संबंधित मुद्याचा अनुपालन अहवाल यंत्रणांनी तात्काळ सादर करावा, तसेच बैठकीला अद्ययावत माहितीसह उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती गोंदिया नयना गुंडे यांनी सांगितले आहे.