गोंदिया पुरवठा विभाग आता कात टाकतोय… आता होणार आहे आयएसओ 9000

0
61

गोंदिया-जीवन म्हणजे सतत बदल आणि तो बदल आपल्या विभागात घडवून आणण्याकरिता सतत प्रयत्न व प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हाधिकारी नयना गुंडे  यांनी पुरवठा विभागाच्या आयएसओ करणे करिता कार्यशाळेत येऊन सर्व स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे मनोबल वाढवले. पुरवठा विभाग म्हणजे फक्त रेशन दुकानदार आणि धान्याचे वाटप असा होत नाही. गोंदिया पुरवठा विभाग अन्नधान्य वाटप मध्ये हा सातत्याने इ पॉज मशीन वर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहत आहे. या विभागाने अधिक पारदर्शक व जनतेस युजर फ्रेंडली होण्याकरिता आयएसओ 9000 चे नामांकन मिळवण्याकरिता  ठरवले आहे. सर्वप्रथम पुरवठा विभागाने आपल्या विचारसरणीमध्ये बदल करून सर्व कागदपत्राचे व फाईलचे वर्गीकरण करण्यासाठी एक मोहीम राबवली. सहा गठ्ठा पद्धतीने सर्व कागदपत्राचे वर्गीकरण करण्याचे काम सध्या कार्यालय गोदाम व तालुका कार्यालय यामध्ये सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये अंतोदय योजनेचे79762 इतके कार्ड असून  340487 लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंबा योजनेचे 154702 कार्ड असून  694563लोक लाभार्थी आहेत. 1035050 इतक्या लाभार्थींना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे सुद्धा वाटप सुमारे 30 महिन्यापासून होत आहे. कोरोनाच्या कालावधी पुरवठा विभागाने दुप्पट कार्य केले आहे.

या सर्व बाबींचा विचार करता अधिक चांगल्या पद्धतीने कार्य कशा पद्धतीने केले जाऊ शकते याचा विचार झाल्यावर आयएसओ नामांकन मिळवण्याकरिता प्रयत्न करण्याचा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी विचार केला. त्यावर कार्य करण्यासाठी आयएसओ मानांकन मिळवून देण्यात नामांकित तज्ञ सल्लागार  गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व आयएसओ बाबतीतले कार्य सुरू आहे. या योजनेच्या यशस्वी होण्याकरिता सर्व पुरवठ्यातील पुरवठा साखळी सामील होणे आवश्यक आहे. करिता पुरवठा निरीक्षक, इन्स्पेक्टिंग ऑफिसर, अव्वल कारकून व गोदाम व्यवस्थापक जिल्हा कार्यालयातील कर्मचारी यांची एकत्रित कार्यशाळा 4 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम या संकल्पनेचा राबवण्याचा मानस केल्याबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती फलके यांचे कौतुक केले.व इतर सर्व विभागाचे सुद्धा प्रोत्साहन देऊन मनोबल वाढवले. जिल्ह्यातील 998  रास्त भाव दुकानदार संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून आपले दुकान आयएसओ 9000 करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. जास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष  प्रकाश डाहोरे व हरर्जित सिंग यांनी जिल्हाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. सालेकसाचे दुकान संघटनेचे अध्यक्ष खेमराज साखरे यांनी नक्षलग्रस्त भागामधील सर्व दुकानदार हे आयएसओच्या कार्यान्वयेनासाठी सज्ज असल्याचे सुद्धा सांगितले. सडक अर्जुनी तालुक्यातील दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्री फुले यांनी सडक तालुका यामध्ये मागे राहणार नाही असे सांगितले. या कार्यशाळेत आयएसओ  9000 बनवण्याकरता सर्व कर्मचारी अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार यांना कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला असून त्याचे निरीक्षण जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी  जिल्हा पुरवठा अधिकारी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी करणार आहेत. जिल्हा कार्यालयातील व तालुका कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तन-मन-धन याने काम करण्याचा निश्चय येथे बोलून दाखवला. 50 स्वस्त धान्य दुकानदार व पूर्ण पुरवठा विभागतील सर्व कर्मचारी यांनी भाग घेतला.अशाप्रकारे   गोंदिया जिल्हा हा आयएसओ करणारच या  निश्चयाने सर्व कार्यशाळेची सांगता झाली आणि आदर्श गणवीर यांनी सर्वांचे आभार मानले.