देव उठनी एकादशी/कार्तिकी एकादशी निमित्त संतनगरीत उसळली भक्तांची गर्दी

0
16

हजारो भक्तांनी घेतला फराळी महाप्रसादाचा लाभ
शेगांव दि.5- संपूर्ण महाराष्ट्रात कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशी  साजरी करण्यात आली. वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी  म्हणजे मोठा सोहळा असतो. या निम्मित संतनगरीत भक्तांची अलोट गर्दी उसळली तर हजारो भक्तांनी श्रीचरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले यावेळी ६० हजार भाविकांनी फराळी महाप्रसादाचा लाभ घेतला.
आषाढी एकादशीपासून चार महिने निद्रीस्त अवस्थेमध्ये असलेले भगवान विष्णू कार्तिकी एकादशी दिवशी उठवतात आणि पुन्हा नव्या, शुभ कार्यांना सुरूवात होते. कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविक पांडुरंगाचे दर्शनासाठी पंढरपूर येथे जातात यानिमित्त श्रींच्या चरणाने पावन झालेल्या  संतनगरी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड क्षेत्रातील भक्तांची अलोट गर्दी पहावयास मिळाली.देव उठाणी एकादशी निमित्त श्री गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक अनुष्ठान, भजन, कीर्तन इत्यादी भक्तिमय कार्यक्रम पारपडले
सायंकाळी ५ वाजता श्रींची रजत प्रतिमा रंगबिरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीत ब्रह्मवृंदाचे मंत्रोपचारात व श्रींचा जयघोष करीत पालखीत विराजित करण्यात आली व श्रींची पालखी मदिर परिक्रमासाठी निघाली.या प्रसंगी श्रीचे सेवाधारी विश्वस्त यांच्या हस्ते श्रीच्या पालखीचे पुजन केले.श्रींची पालखी, अश्व , श्वेत वस्त्र परिधान करून शेकडो वारकरी खांद्यावर धर्मध्वज ,टाळ ,मृदंग,च्या मधुर तालावर थिरकत विठ्ठल ,विठ्ठल पांडुरंग, गण गण गणात बोते च्या भक्तीच्या रंगात रंगून मदिर परिकर्मेसाठी निघाले पालखी श्रीचे सेवाधारी निवास, श्री बाळाभाऊ महाराज मंदिर, श्री महाप्रसादालय, श्री लायब्ररी जवळून, पश्चिम द्वारातून श्री मंदिरामध्ये आगमन झाले. संध्याकाळी पालखी श्रींच्या मंदिरात पोहचताच सायंकाळी ६:३० महाआरती होऊन पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
देव उठनी एकादशी निमित्त हजारों भक्तांनी श्री चरणी नतमस्तक होऊन  आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी श्रींच्या मंदिरात साठ ते सत्तर हजार भाविकांनी फराळ , महाप्रसादाचा लाभ घेतला.गर्दीचा फायदा घेऊन कोणत्याही अनुचित प्रकार घडवू नये म्हणून पोलीस प्रशासना कडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.