लाचलुचपत विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह

0
31

अर्जुनी मोर-हपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ठिकठिकाणी पत्रके वाटप करून भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात आली.
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्पेष्ठ मॉर्निग वॉक पॉईट इंदिरा गांधी स्टेडियम येथे पत्रके वाटप करण्यात आली. तर रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन गोंदिया येथे जनजागृती करण्यात आली. तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय, नवेगावबांध येथील आठवडी बाजार, बाराभाटी, मोरगाव, बोंडगावदेवी, महागाव येथे भेट देवून वर्दळीच्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जनजागृतीपर स्टीकर्स, पोस्टर्स लावून नागरिकांना प्रबोधन करण्यात आली. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा बस स्टॅड येथील टॅक्सी संघटना यांच्या माध्यमाून जनजागृती करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची माहिती व संपर्क क्रमांकाचे स्टीकर्स टॅक्सी वाहनावर लावून भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे सडक अजुर्नी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, मुख्य गाव कोहमारा, गोंगले, पांढरी, डव्वा, खजरी या ठिकाणी ग्रामभेट देवून वर्दळीच्या ठिकाणी स्टिकर्स, पोस्टर्स लावून नागरिकांना पत्रके वाटून भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोरेगाव येथे विद्यार्थ्यांना संबोधित करून भ्रष्टाचार विरूध्द जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे विभागाच्या कामकाजाची माहिती देवून तक्रार कशी करावी, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सामान्य नागरिकांनी भ्रष्टाचाराविरूध्द तक्रार असल्यास निर्भरपणे पुढे येवून भ्रष्टाचाराचे उच्चाटन करावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.