सिनेट निवडणुकीत, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमेना संस्था व्यवस्थापनाचे प्रतिनिधी म्हणुन उमेदवारी!

0
12

संस्था चालकांचा अडचणी विद्यापीठात मांडुन, शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा निर्धार!
धर्मांध संस्थाची हुकुमशाही विद्यापीठात चालु देणार नाही.

वर्धा,दि.09ः  महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहु महाराज,लोकमान्य टिळक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मविर भाऊराव पाटील, डाॅ. पंजाबराव देशमुख, या थोर महान देशभक्त शिक्षणविद संस्थाचालकांची परंपरा, महाराष्ट्रातील खाजगी संस्थाचालक चालवत असून, राज्यातले ९०% शिक्षण या खाजगी संस्थांच्या माध्यमातुन दिले जात आहे. लहान मोठ्या गावात शहरात, याच ध्येयाने प्रेरित होवुन,अनेकांनी ग्रामीण गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये काढलीत!इमारती बांधल्या, त्यापैकी ६०% पेक्षा जास्त ही कायम विना अनुदानित आहे. असे असतांना सुध्दा सामाजिक भावनेतुन, शासनाचा कुठलाही निधी न घेता हे संस्थाचालकांचे कार्य सुरू आहे.
असे असतांना सुध्दा आज केवळ विद्यापुठातच नव्हे तर शासन दरबारी सुध्दा, या संस्थाचालकांना विश्र्वासात न घेता, अडीअडचणीत आणणारे समाज व विद्यार्थी विरोधी कायदे केले जातात! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठासह महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात गेल्या विस वर्षात कुलगूरूंनी कधी संस्थाचालकांची मिटींग घेवून, त्यांना सन्मान दिलेला नाही. आणि आता तर एका विशिष्ठ मनप्रवृत्तीच्या ताब्यात महाराष्ट्रातील विद्यापीठे,राज्यपालाच्या निर्देशासह कुलगुरूंसह, नियुक्त सिनेट सदस्य, यांच्या नियुक्त्या आणि विद्यापीठ प्राधिकरणे देण्याचा मागील आठ वर्षापासुन सातत्याने एककलमी कार्यक्रम सुरू आहे.महाराष्ट्रातील विद्यापीठे ही खर्‍या अर्थाने विद्यार्थीभिमुख असायला हवी. विद्यार्थी व त्यासाठी महाविद्यालये चालवणार्‍या संस्था याचा विचार होणे आवश्यक आहे. परंतु आजची विद्यापीठे व शासनाची शिक्षण व्यवस्था ही या दोघांचाही विचार न करता,ती केवळ विद्यापीठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठीच चालविली जात आहेत का, असा एककल्ली कारभार सूरू आहे. शिक्षक संघटना आपल्या संघटनेच्या बळावर आपल्याला जे पाहीजे, ते मिळवून घेतात, प्रसंगी साधी फी वाढ झाली,तर काही शिक्षक संघटना विरोध करतात. विद्यार्थ्यांची फी शासन देते. महागाईप्रमाणे दर वेळी महागाईभत्ता वाढवून मागणारे, विद्यापीठात फी वाढ आली की त्याचा विरोध करतात. मग कायम विनाअनुदानित व अनुदानित संस्थाचालकांनी महाविद्यालये कशी चालवावीत. तेथील शिक्षक कर्मचार्‍यांना कसा पगार द्यायचा!याचा कुठलाही आवाज विद्यापीठात उठत नाही. विद्यार्थी व संस्थाचालकांचा आवाज विद्यापीठ व त्या माध्यमातुन शासनाकडे प्रभावीपणे मांडण्यासाठी, रा.तु.म. नागपुर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत, संस्था चालकांचा प्रतिनिधी म्हणुन व्यवस्थापन मतदार संघातुन आपली उमेदवारी आहे, असे निवेदन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी दिले आहे.संस्थाचालकांचा न्याय्य आवाज विद्यापीठ आणि शासनापर्यंत पोचविण्यासाठी, संस्थाचालकांनी आपला खरा प्रतिनिधी निवडण्यासाठीच मला२० नोव्हेंबर २०२२ ला होणार्‍या विद्यापीठाच्या निवडणुकीत मला मतदान करावे,असे आवाहन केले आहे.