
भंडारा-आश्वासन देऊन विसरून जाणार्यांपैकी आम्ही नाही. जे बोलतो ते पूर्ण करतोच. महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानाला बोनस देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते व शेतकर्यांना बोनस देऊन दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. विद्यमान शासनाने संकटात असलेल्या शेतकर्यांना मदतीचा हात देत धानाला प्रतिक्विंटल १ हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी खा. प्रफुल पटेल यांनी केली.
पवनी तालुक्यातील अड्याळ येथे खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, शेतकर्यांचा उत्पादीत धान बाजारपेठेत आला असून, खासगी व्यापार्यांना कमी किमतीत विकावा लागत आहे. हि बाब लक्षात घेता शासकीय धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे. प्रति एकरी २0 क्विंटल धान खरेदीची र्मयादा वाढवण्यात यावी. भंडारा व गोदिया जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.
गोसेखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी २0१२ ला संपुआ सरकारच्या काळात आम्ही १२00 कोटी रुपयांचा पॅकेज दिला होता. गोसे खुर्द धरणाला भरघोस निधी उपलब्ध होऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, याकरिता राष्ट्रीय प्रकल्प घोषित केले. पण, विद्यमान केंद्र सरकारने राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून घेतला, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, आ. राजू कारेमोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, पंढरी सावरबांधे, धनंजय दलाल, यशवंत सोनकुसरे, सरिता मदनकर, लोमेश वैद्य, मुकेश बावणकर, शैलेश मयुर, नुतन कुझ्रेकर, सुनंदा मुंडले, जयश्री भुरे, विवेकानंद कुर्झेंकर, हिरालाल खोब्रागडे, मनोज कोवासे, चेतक डोंगरे, सोमेश्वर पंचभाई, हरिष तलमले, छोटु बाळबुद्धे, सीमा प्रशांत गिरी, राजेश्वर सामृतवार, नाशिका वंजारी, शेखर पडोळे, विवेक रघुते, मनोरमाताई जांभुळे, संजय तळेकर, तुळशिदास कोल्हे, कुलदीप उराडे, हेमंत श्रृंगारपवार, राजेश वंजारी, दिलीप सोनुले, सरोज पवार, देवानंद गभने, पुरुषोत्तम गडकर, कुणाल पवार, केतन रामटेके, सूरज शेंडे, नितीन बरगंटीवार, विपीन फुलबांधे, टिंकेश्वर वाघाये, जाबु शेख, कलीम शेख, नदिम पटेल, अशपाक खान, अध्यक्ष जामा मस्जिद, आशिफ खान, नजीर शेख, अर्जुन मांढरे, देवा, शिवरकर, सत्यपाल नगरे, केतन नगरे, राहुल मोहनकर, दत्तू गायधने, किरण गायधने, सुनील देशमुख, संदिप कावळे, मंगेश देशमुख, रविंद्र बंजारी, प्रमोद कुंभलकर, विशाल खोब्रागडे, दिशांत कासारे, तुषार कराडे, पवनी तालुका व अड्याळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.