क्रांतिकारी बिरसा मुंडा पराक्रम आणि स्वातंत्र्याचे खरे पात्र – आ. अग्रवाल

0
11

गोंदिया- क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा हे खर्‍या अर्थाने पराक्रम आणि स्वातंत्र्याचे खरे पात्र आहेत. त्याचप्रमाणे राणी दुर्गावती यांनी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी मुघलांशी लढा देऊन हौतात्म्य पत्करले. ती एक अतिशय शूर आणि धाडसी स्त्री होती. जिने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपले राज्य तर घेतलेच. पण, राज्याच्या रक्षणासाठी अनेक लढायाही केल्या. आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर शौर्य आणि पराक्रमात अनेक राजांची नावे समोर येतात. पण इतिहासात एक अशी शक्ती देखील आहे, जी आपल्या पराक्रमासाठी ओळखली जाते, ती म्हणजे राणी दुर्गावती आणि क्रांतिकारी बिरसा मुंडा असे प्रतिपादन आ.विनोद अग्रवाल यांनी केले. तालुक्यतील बटाणा येथे क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा व वीरांगना राणी दुर्गावती यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आ.विनोद अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आ.अग्रवाल बोलत होते.
कार्यक्रमाला पं. स. सभापती मुनेश रहांगडाले, दीपप्रज्वलक टिटुलाल लिल्हारे, प्रमुख पाहुने म्हणून नरेश नागरीकर, नारायण कुसराम, विजय कुसराम, अमरसिंह मलघाम, भारत पंधरे, तुलाराम ठाकरे, नत्थूभाऊ रहांगडाले, रहांगडाले, गणेशभाऊ तुलशीकर, पटले, सुरेंद्र साठवने, तंटामुक्ती अध्यक्ष, र्शावणभाऊ रहांगडाले, ज्ञानेश्‍वर येडे, सोमेंद्र टेंभरे, बलीराम कुसराम, नंदलाल कुसराम, बन्सोड ऋषीकुमार रहांगडाले, गुलाब ठाकरे, प्रतीक रहांगडाले, विश्‍वनाथ रहांगडाले मधुभाऊ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.