शासकीय रक्तपेढीने रुग्णाला दिला मुदतबाह्य रक्त

0
16

गोंदिया,दि.०२-येथील शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयात असलेली रक्तपेढी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहू लागली आहे.या आधी रुग्णाच्या नातेवाइकांना रुक्त देतांना पैशाची मागणी होत असल्याचा आरोपासोबतच इतर कारणाने चर्चेत असलेल्या या रक्तपेढीतून २७ फेबुवारीला दुपारी १.३० वाजेच्या सुमारास प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या पतीला मुदतबाह्य रक्त देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.२६ फेबुवारीच्या रात्री ११ च्या सुमारास बाई गंगाबाई महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला रक्तस्राव सुरू झाल्याने वैद्यकीय अधिकाèयांनी रक्ताची गरज भासणार असल्याचे त्या महिलेच्या नातेवाइकाला सांगितले.त्यानुसार सदर महिलेचे पती हे शासकीय रक्तपेढीत ओ पॉझिटिव्ह रक्त घेण्यासाठी गेले असता आधी रक्त नसल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर तुम्हाला रक्त द्यावे लागेल नंतर आम्ही रक्त देतो असे त्या रक्तपेढीतील कार्यरत कर्मचाèयांनी सांगितले.त्यानुसार रुग्णमहिलेच्या पतीने स्वतः रक्त दिले त्यानंतर रक्तपेढीमध्ये असलेल्या वाहन चालकांने त्या महिलेच्या पतीला मुदतबाह्य झालेला ओ पॉझिटिव्ह रक्त दिले.ते रक्त घेऊन सदर महिलेचा पती रक्त युनिट क्र.८११ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे गेला,ते रक्त चढविण्यासाठी हातात घेतल्याबरोबर या रक्ताची मुदत संपल्याचे वैद्यकीय अधिकाèयाला दिसताच त्यांना रक्त चढविण्यास नकार दिला.हा रक्त मुदतबाह्य असल्याने महिलेला धोका होऊ शकतो असे सांगत चुकीच्या रक्तापासून महिलेला वाचविले त्यानंतर दुसरे रक्त आणण्यात आले.या आधी केटीएस रुग्णालयात चुकीचे रक्त चढविल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यापूर्वीच घडली होती.तर येथील रक्तसंक्रमण अधिकारी सुर्वणा हुबेकर यांच्यावर रक्तपेढीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी ठपका ठेवून त्यांना काढण्यात आले.विशेष म्हणजे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजिव दोडके यांचे रक्तपेढीवर नियंत्रण आहे.त्यांनीच गेल्यावर्षी रक्तपेढीमध्ये मोठ्याप्रमाणात लूट होत असल्याचे पत्रकारांना स्वतःच सांगितले होते आता मात्र ते गप्प का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.याच महिन्यात १७ व २० फेबुवारीला प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना रक्तस्राव अधिक झाल्याने त्यांनाही रक्ताची गरज होती.परंतु त्यावेळीही रक्त उपलब्ध नव्हते,तेव्हा त्या रुग्णांच्या कुटुबियांनी २००० रुपये खर्च करून लाईप लाइन ब्लड बँकमधून रक्त आणले होते.
त्यातही गेल्या २०१५ फेबुवारी महिन्यात १४८० युनिट रक्त संकलन झाले होते.यावर्षी मात्र ४१६ युनिट संकलित झाले.त्यातही नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातून रक्त मागविण्यात आले आहे.त्यानंतर ओ पॉझिटिव्ह गटाचे रक्त उपलब्ध असतानाही मुदतबाह्य रक्त का देण्यात आले हा प्रश्न आहे.