
“स्वच्छ जल से सुरक्षा ” अभियान जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम
गोंदिया- जल जीवन सर्वेक्षण 2023 चा भाग म्हणुन गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत “स्वच्छ जल से सुरक्षा ” अभियान राबविण्यात येत असुन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे हस्ते आज जिल्हा परिषदेत कॉन्फरन्स हॉल येथे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नरेश भाडांरकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सुमीत बेलपत्रे, वरिष्ठ भुवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा गोंदियाचे एस. एस. खोडे, यांचेसह विस्तार अधिकारी आरोग्य श्री नंदागवळी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेसह जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार/ तज्ञ उपस्थित होते.
अभियानाच्या माध्यमातुन स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी नागरीकांना नियमीत पुरवठा व्हावे या उद्यात हेतुने दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात स्वच्छ जल से सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाअंतर्गत जिल्हयातील नळ पाणी पुरवठायोजनांच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जिओ टॅगिग, पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच FTK (फिल्ड टेस्ट किट) व्दारे सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे परिक्षण करावयाचे आहे. दुषीत पाण्यामुळे विविध जलजन्य आजार पसरु शकतात. पाण्याची गुणवत्ता राखणे ही सर्व ग्रामपंचातयीची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने राज्यात स्वच्छ जल से सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नळ पाणी पूरवठा योजनांच्या स्त्रोतांची हर घर जल या मोबाईल ॲपमध्ये जीओ टॅगिग पुर्ण करुन पाच महिलांच्या माध्यमातुन सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्याचे आवाहन श्री पाटील यांनी केले.
सदर अभियानामध्ये गावस्तरावरील पिण्याच्या पाण्याचे नमुने जलसुरक्षक आणि आरोग्य सेवक यांच्या माध्यमातुन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोहचविण्यात यावे याकरीता वैद्यकिय अधिकारी यांनी समन्वय साधावा असे आवाहन नरेश भाडांरकर उपमुकाअ पाणी व स्वच्छता यांनी केले.
या अभियानादरम्यान नळ पाणी पुरवठा योजनांच्या स्त्रोतांचे न चुकता पाणी नमुणे केद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदी करुन पाठविणेबाबत तसेच तपासणीअंती पलोराईड, नायट्रेट, आयरण व इतर घटकांची योग्य प्रकारे नोंदी घेण्याबाबत सुमीत बेलपत्रे यांनी सुचना दिल्यात.
या अभियान कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची मान्सुन पश्चात रासायनिक व जैविक तपासणी करीता पाणी नमुणे गोळा करणे बाबतीचे नियोजन, तपासणी झाल्यानंतरच्या नोंेदी WQMIS पोर्टलवर करावयाची आहे. याचसोबत अनुजैविक / रासायनिक फिल्ड टेस्ट किटची उपलब्धता करुन गावस्तरावर निवडण्यात आलेल्या पाच महिलांच्या मदतीने पाणी तपासणी पुर्ण करावयाची असल्याचे मुकेश त्रिपाठी जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेश उखळकर माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार यांनी केले असुन अभियान कालावधीत राबविण्यात येणात्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमासाठी कु. तृप्ती साकुरे मनुष्यबळ विकास सल्लागार, कु. शोभा फटींग सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार, विशाल मेश्राम सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार, प्रदिप शरणागत, सुनील गराडे, रमेश उदापुरे आदींनी सहकार्य केले.