
राजा पवार : अ. भा. भाेयर पवार महासंघाचे संमेलन
नागपूर : प्रत्येक समाजाची वेगळी भाषा, संस्कृती, परंपरा लाभली आहे. ते विलुप्त न हाेऊ देता टिकवून ठेवण्याची संवर्धन करणे ही समाजातील प्रत्येक समाजबांधवांची जबाबदारी आहे. त्यातूनच समाजाचे वेगळेपण जपले जाते, असे मत बैतूल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजा पवार यांनी केले.
अखिल भारतीय भाेयर पवार महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सत्कार आणि युवक-युवती परिचय मेळाव्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. नागपुरातील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे आयाेजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष डाॅ. नामदेव राऊत हाेते. कार्यक्रमाला कारंजा (घा.) नगरपंचायतचे उपाध्यक्ष भगवान बुवाडे, पवार युवा मंडळ महू (इंदूर)चे अध्यक्ष सुनील बाेबडे, पांढुर्णाचे नगरसेवक यादवराव डाेबले, सतपुडा पवार समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बारंगे, वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे, माजी सभापती चेतना मानमाेडे,राष्ट्रीय पवांर क्षत्रिय महासभेचे उपाध्यक्ष माेतीलाल चाैधरी, महिला व बाल कल्याण सभापती प्रा. अवंतिका लेकूरवाळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. एका समाजाचा सदस्य म्हणून प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपणे हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे, असे सांगत समाजाच्या विकासासाठी हातभार लावावा, असे राजा पवार यांनी आवाहन केले.
कार्यक्रमात दहावी-बारावी, पदवी-पदव्युत्तर तसेच इतर अभ्यासक्रमातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. साेबतच ज्येष्ठ नागरिकांचाही गाैरव करण्यात आला. दुसऱ्या सत्रात युवक-युवती परिचय मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. भगवान बन्नगरे, अध्यक्ष कारंजा संघटन मुन्नालाल पिंजारे, मुन्नालाल पवार, डॉ. जीवन किनकर, डॉ. रोशन राऊत, कौशिक चौधरी, पृथ्वीराज रहांगडाले माजी प्राचार्य वसंत खवसे, अशोक पाठे वर्धा, किशोर हजारे कारंजा, जगदीश पवार, रामेश्वर हजारे यांच्यासह माेठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित हाेते. मान्यवरांच्या हस्ते महासंघाची मुखपत्रिका ‘वाटचाल’ आणि उपवर-वधूची परिचय पुस्तिका ‘भविष्याची वाटचाल’चे विमाेचन करण्यात आले. तसेच याप्रसंगी आराेग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचेही आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात डाॅ. उदय चाैधरी, जयश्री बारंगे, डॉ. भाग्यश्री चोपडे, डॉ. रवी भांगे आदींनी सेवा दिली.
सूत्रसंचालन अंजली देवासे यांनी केले. आभार महासंघाचे सचिव मोरेश्वर भादे यांनी मानले. आयाेजनासाठी मधुकर चोपडे, सुभाष पाठे, श्रावण फरकाडे, प्रभाकर डाेबले, माेहन हजारे, संजय फरकाडे, शंकर पाठेकर, युवक आघाडीचे किशोर चोपडे, नंदू ढोबाळे, प्रवीण डोंगरे, रामेश्वर चोपडे, अरविंद देशमुख, अर्चना खवसे, पल्लवी भादे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमात किडनीग्रस्त चिंचाेली (ता. कारंजा, जि. वर्धा) येथील सीमा छगन टोपले या तरुणीला समाजातील दानदात्यांसह भाेयर पवार महासंघातर्फे मदत करण्यात आली.