32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,श्रीमती गुंडे यांची बदली

गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,श्रीमती गुंडे यांची बदली

0
2642

blank

गोंदिया,दि.15ः- गोंदियाच्या जिल्हाधिकारी डाॅ.नयना गुंडे यांची आज 15 डिसेंबरला सामान्य प्रशासन विभागाने बदली केली असून त्यांच्या जागेवर नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांची नियुक्ती केली आहे.गोतमारे यांना तत्काळ आपल्या पदाचा पदभार वरिष्ठांच्या सल्ल्याने इतरांना सोपवून गोंदियात रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.गोतमारे हे 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.नागपूर विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झालेले आहे.त्यांनी मेघालय राज्यातही आपली सेवा दिलेली आहे.तसेच य़शदा पुणे येथेही काम केले आहे.जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे यांचा कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आलेली आहे.विशेष म्हणजे गुंडे यांच्याबाबत कुठलीच तक्रार नसल्याचेही कळते.

blank