36.9 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home विदर्भ खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीचे आंदोलन

खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीचे आंदोलन

0
27

गोंदिया,-महावितरणचे खासगीकरण धोरण बंद करण्यात यावे, तसेच कर्मचार्‍यांच्या समस्या मार्गी लावण्यात याव्यात या मुख्य मागणीला घेवून महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्यावतीने आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत रामनगर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महावितरण कंपनीच्या भांडूप परिमंडळातील कार्यक्षेत्रात अदानी विद्युत कंपनीने वितरणाचा विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्यास संघर्ष समितीने विरोध केला. दरम्यान संघर्ष समितीमध्ये सहभागी संघटनेने 5 नोव्हेंबरच्या बैठकीत महाराष्ट्रातील वीज उद्योगाचे खासगीकरण व अदानी विद्युत प्रकल्पाचा हस्तक्षेप याचा निषेधषे करण्याचे ठरविण्यात आले.त्याअनुषंगाने महावितरणमध्ये कर्मचार्‍यांच्या अनेक समस्या कायम आहे. त्या समस्यांची निर्मुलन आंदोलन करूनही पूर्ण होत नसल्याने आंदोलनाचा दुसर्‍या टप्प्यांतर्गत विविध संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभिकर्ता अभियंता संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.हे आंदोलन अद्यापही सुरू असून 19 डिसेंबर रोजी महावितरणच्या तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाबरोबर बेमुदत असहकार आंदोलन, 23 डिसेंबर रोजी विधानसभेवर मोर्चा, 29 डिसेंबर रोजी द्वार सभा, 2 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, 4 जानेवारी रोजी 72 तासांचा संप तर 18 जानेवारीपासून बेमुदत संप करण्याचा
इशारा संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे.