
गोरेगाव,दि.25ः मोहाडी येथील युवक नरेंद्र चौरागडे यांनी कला शाखेत पदवी , ग्रंथालय शास्त्र विषयात पदवी घेतली. सन २००७ ला मोहाडीचे सरपंच म्हणून २०१२ पर्यंत कार्य केले.त्यानंतर सन २०१२ ते २०१७ पर्यंत सदस्य म्हणून काम केले. या कालावधीत त्यांनी शेतीत जाणारे पांदन रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय केली, अंतर्गत सिमेंट रस्ते, कच्च्या रस्त्यावर मातीकाम करुन मुरुम टाकणे, खडीकरण करणे कामे केल्याने गावकऱ्यांचे चाहते झाले. राजकारणाबरोबर समाज कार्याला सुरुवात केली. गावात पुरुष स्वाभिमान बचतगट,युवा शक्ती बचतगट, कोरोना काळात गरजुंना आर्थिक मदत केली.गावातील समस्या तत्काळ सोडविता यावे यासाठी सामाजिक ग्रुप तयार केला. युवक, जेष्ठ नागरिक यांना मार्गदर्शन करुन स्वतः पुढाकार घेत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे या गावाचा कायापालट करण्यासाठी युवकापासुन जेष्ठ नागरिक यांनी गावाचा कारभारी करण्याचे ठरविले.निवडणुक प्रचार करण्यासाठी कमलेश पटले,धूर्वराज पटले, श्रीराम पारधी,जे.जे.पटले,परमानंद तिरेले,वाय.एफ.पटले,आर.एफ.पारधी, देवराज चौधरी,संजय पारधी योगेश्वर पटले,टिकेश धपाडे,छनवॅरखा पठान,सय्यद शेख,प्रमोद चौरागडे, चैतराम भोयर,,कुंदन भोयर,छगनलाल धपाडे,लिखीराम बघेले,जियालाल रहांगडाले, हेमराज धपाडे,पुरनलाल ठाकरे, हिरालाल महाजन,शिवराज मोहनकर,नुतन सोनवाने, मुकेश येरकडे, दुर्गेश चचाने यांनी आपल्या सहका-यासोबत प्रचाराची धुरा सांभाळली.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला समर्थन देत ग्राम विकास पॅनल मोहाडी तयार करून वचननामा मतदारांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले.
वचननाम्यात शेत पांदन रस्ते खडीकरण करणे, श्रावणबाळ योजनचे अर्ज ग्रामपंचायतव्दारे कोणताही मोबदला न घेता लाभ मिळवुन देणे, गावातील रस्ते सिमेंट, काँक्रिट चे तयार करून नवीन रस्ते तयार करने, इंद्रप्रस्थ नगराची पाणी समस्या सोडविणे, घरकुल लाभार्थ्यांची फाईल निःशुल्क तयार करने, सौंदर्यीकरण करने, दुकान गाळे तयार करने, व्यसनमुक्त गाव करने, बचत ग्राम म्हणुन गावाची ओळख करून देने असे अनेक वचन ग्राम विकास पॅनलने मतदारांना दिले. गावात झालेले समाज कार्य, निवडणुकीत दिलेले वचननामा यावर युवकांनी विश्वास ठेवून नरेंद्र कुमार यशवंत चौरागडे यांना सरपंच म्हणून निवडून दिले. त्याचबरोबर भिवराज शेंडे,योगराज भोयर,प्रभा पंधरे यांना सदस्य म्हणून निवडून दिले आहे.