मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय गोरेगांव मध्ये स्पोर्ट्स डे व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

0
15

गोरेगांव :- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय गोरेगांव मध्ये दोन दिवसीय स्पोर्ट्स डे व वार्षिक स्नेहसंमेलन दी 22.12.2022 व 23.12.2022 ला आयोजित करण्यात आले. या दोन दिवसीय स्पोर्ट्स डे व वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी अध्यक्ष स्थानी शाळेचे संस्थापक तसेच आरटीई फाउंडेशन गोंदिया चे जिल्हा अध्यक्ष प्रा.आर. डी. कटरे हे उपस्थित होते. तसेच उद्घाटक म्हणुन राहुल कटरे गोरेगांव, त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणुन पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष लोकेश कटरे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी  सी. बी. पटले, प्राचार्य सौ. सी. पी. मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेस्वरूपी विराजमान माता शारदा, भारत माता, मेजर ध्यानचंद, यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या प्राचार्य सौ. सी. पी. मेश्राम यांनी शाळेच्या प्रास्ताविक सादर करतांना शाळेची नीव राखण्यापासून ते आज पर्यंत असलेल्या सर्व सोईसुविधांची माहिती कार्यक्रमाच्या माध्यामातून पालकांना दिली. तसेच उद्घाटक राहुल कटरे, प्रमुख अतिथी लोकेश कटरे, प्रशासकीय अधिकारी सी. बी. पटले यांनी स्नेहसंमेलनाच्या माध्यामातून विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. स्नेहसंमेलन हे फक्त विद्यार्थ्यांना मनोरंजन नसून त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना सर्व समोर प्रदर्शित करण्याचे त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधे असलेल्या उणीवा दूर करण्याचे एक माध्यम असते असे आपल्या मार्गदर्शन भाषणातून सांगितले. कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी उपस्थित प्रा.आर डी. कटरे यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणातून येत्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे नाव मॉडेल ठेवण्याचे उद्देश अध्यक्षीय भाषणातून सर्वांसमोर मांडले. व ते आज सर्वांसमोर एक मॉडेल तयार होऊन डौलाने उभी आहे यांबद्दल संपूर्ण माहिती पालकांना दिली. स्पोर्ट्स डे निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात आले. त्यामधे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात व आनंदाने स्पर्धा मध्ये भाग घेतले. त्याचबरोबर पालकांकरिता खेळाचे आयोजन शाळेमार्फत करण्यात आले त्यामधे पालकांनी सुद्धा आनंदात खेळांमधे भाग घेत सहकार्य केले. विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्नेहसंमेलन च्या माध्यामातून विद्यार्थ्यांनी विविध रंगारंग कार्यक्रमाची प्रस्तुति सादर केली त्यामध्ये एकांकिका, कोळीगीत, समूहगीत अशाप्रकारचे कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला यशस्वी रित्या संपन्न करण्याकरिता शाळेतील प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 10 वी चे विद्यार्थी समीर रहांगडाले, प्रेरणा रहांगडाले यांनी केले तसेच आभार स. शी. आशा बोपचे यांनी मानले.