
गोंदिया-तिन्ही वीज कंपन्याचे खासगीकरण करण्याच्या राज्य सरकारच्या धोरण व विविध समस्यांना घेऊन वीज कामगार, अधिकारी अभियंते व कंत्राटी कामगार यांनी नागपूर विधिमंडळावर मोर्चा काढला. मोच्र्यात हजारोच्या संख्येत सहभागी झालेल्या वीज कामगार अभिंयते, अधिकारी व कंत्राटी कामगारांनी सरकारच्या धोरणांचा विरोध करीत वीज कंपन्यांचे खासगीकरण करू नये, अशी मागणी केली.
अदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड या खासगी कंपनीने महावितरण कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या भांडुप परिमंडळातील ठाणे व वाशी मंडळात समांतर वीज वितरणाचा परवाना विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेला आहे. त्याला विरोध दर्शविण्यात आला. त्याचप्रमाणे तिन्ही वीज कंपन्यात रिक्त असलेले ४0 हजार पदे तात्काळ भरावी, तिन्ही कंपन्यांमध्ये काम करणारे कंत्राटी व आऊटसोर्सिंग याना वीज कंपन्यांच्या नोकरीमध्ये सामावून घ्यावे, समान काम समान वेतन लागू करावे, इंनपॅनलमेंट द्वारे ठेकेराकडून करण्यात येणारे कामे बंद करावे, १ एप्रिल २0१९ नंतर तयार झालेले उपकेंद्रे खासगी तत्त्वावर चालविण्यात देण्याची पद्धत बंद करणे इत्यादी मागण्यांना घेवून हजारोच्या संख्येत वीज कामगार, अभियंता, कर्मचार्यांना मोर्चा काढला होता. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन देऊन वीज कंपन्यांचे खासगीकरण करू नये, अशी मागणी शासनाकडे मागणी करण्यात आली.
संघर्ष समितीमध्ये सहभागी संघटनांचे पदाधिकारी मोहन शर्मा, संजय ठाकूर, कृष्णा भोयर, शंकर पहाडे, आर. टी. देवकांत, सय्यद जरिरोहिन, दामोदर चंगोले, राजन भानुशाली, राजेश कठाळे, मधुकर सुरवाडे, एच. के.लोखंडे, संजय खाडे, नवनाथ पवार, प्रभाकर लहाने, दत्तात्रेय गुंटे, उत्तम पारवे, ललित शेवाळे, प्रकाश गायकवाड, श्रीमती स्नेहा मिर्शा, विठ्ठल भालेराव, शिवाजी वायफळकर आदि पदाधिकार्यांनी मोर्चाला संबोधित करून शासनाला इशारा दिला. या मोच्र्यात हजारोच्या संख्येत महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अधिकारी, अभियंते संघर्ष समितीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.