किसान नेते राकेश टिकैत यांची नागपूर येथे  येत्या ११ जानेवारी २०२३ ला जाहीर सभा

0
27

नागपूर, दि.२६ (प्रति ) : भारतातील किसान नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा वसंतराव देशपांडे सभागृहात येत्या ११ जानेवारी २०२३ मंगळवारला दुपारी १ वाजता  होत आहे, अशी माहिती बहुजन संघर्श समितीचे  मुख्य संयोजक व बहुजन संघर्श पाक्षिकाचे संपादक नागेश चौधरी यांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन  बहुजन संघर्श समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या जाहीर सभेला किसान संघर्श समितीचे अध्यक्ष व  किसान नेते डॉ. सुनीलम उपस्थित राहणार आहेत.

 या सभेच्या  पूर्वतयारीसाठी  25 डिसेंबर २०२२ रविवारला   नागेश चौधरी यांच्या अध्यक्षते खाली एक  सभा वर्धा रोड वरील पावनभूमी परिसरातील सेंट्रल इंडिया इन्स्टिटूट ऑफ मॅनेजमेंट येथे संपन्न झाली. या सभेला  शेतकरी व सामाजिक क्षेत्रातील भरपूर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पुढील तयारीसाठी नागपुरातील विचारवंत व सहकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील  कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या समस्यांचे अभ्यासक व विचारवंत यांची सभा लवकरच  आयोजित करण्यात यावी असे यावेळी ठरले.

प्रा. जवाहर चरडे यांनी ही सभा योग्य वेळी आयोजित केली आहे असे सांगत आज भारतातील शेतकरी हा हवालदिल अवस्थेत आपले जीवन जगत आहे.मात्र विदर्भातील  शेतकरी हा  संघटीत नाही तसेच तो  नेतृत्वहीन आहे.जो तो राजकीय फायदा पाहणारे आहेत अशी प्रखर टीका त्यांनी करीत  विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती फारच भयावह असल्याचे वास्तव त्यांनी यावेळी मांडले. विजय बाभुळकर यांनी चर्चेत भाग घेताना शेतकरी चळवळीतील लोकांना सह्भागी करून घेण्याची सूचना केली.शरद वानखेडे यांनी चर्चेत भाग घेत या जाहीर सभेची तयारी मोठ्या प्रमाणात करण्याची सूचना केली.सहभागी झालेल्या बहुतेक कार्यकर्त्यांनी  आर्थिक व इतर जबाबदारी स्विकारण्याबाबत  आश्वस्त केले.सभेचे अध्यक्ष नागेश चौधरी म्हणाले की डॉ.सुनीलम यांचा संबंध मागील  तीस वर्षांपासूनचा आहे.मध्यप्रदेशातील  मुलताई येथे शेतकरी आंदोलनात गोळीबार झाला होता व त्यात १८ शेतकरी ठार झाले होते. त्या आंदोलनादरम्यान त्यांचेशी भेट व चर्चा झाली होती. शेतकरी आंदोलनाला मदत व्हावी म्हणून आम्ही  करोना काळात लोकांना आवाहन केले होते की शेतकरी आंदोलनाला मदत करा.त्याला चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळाला होता. परंतु  त्याच दरम्यान शेतकरी आंदोलन समाप्त झाले. शेतकरी नेते  राकेश टिकैट यांनी देशभर दौरे करून शेतकरी लोकांमध्ये  जागृती  व संघटित करण्याची घोषणा केली आहे. त्यांना योग्य  प्रतिसाद देण्यासाठी म्हणून ही  सभा आयोजित करण्याचे ठरले आहे , म्हणून ही सभा होत आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.सभेचे  संचालन व प्रास्ताविक सुनील जुमडे यांनी केले.बैठकीत ए.के.घोष, विनोद उलीपवार, गोविंद वरवाडे , दिवाकर वर्षे, रामलाल कोकोडे, पुंडलिक तायडे, डॉ.सिध्दार्थ वासनिक, अॕड. अनिल काळे, इंजि. सुषमा भड,शुभांगी घाटोळे,डॉ.भिमराव मस्के,डॉ. प्रतिभा मस्के,गुलाम करीम,अमरदीप शामकुंवर,अर्चना बरडे,प्रमोद मुन,कल्पना मुन,इंद्रजाल जौंजाळकर, दादासाहेब पिंदुरकर,अरविंद आसटकर  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.