जुनी पेन्शन संकल्प यात्रेला यंग टिचर्स असोसिएशनचा जाहीर पाठींबा

0
14

.पेन्शन संकल्प यात्रेत सदस्यांनी महामोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर, दि.२६ (प्रति) : जुनी पेन्शन संकल्प यात्रेला यंग टिचर्स असोसिएशनने  जाहीर पाठींबा  जाहीर केला असल्याची घोषणा यंग टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ .बबनराव तायवाडे यांनी आज  केली आहे .

महाराष्ट्र शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी जुनी पेन्शन संकल्प यात्रा ही २५ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२२ या कालावधीत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनच्या निमित्याने विधान भवनावर धडक देत आहे. १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांसह अन्य सर्व संवर्गातील कर्मचा-यांच्या सुरक्षित भविष्यासाठी जुन्या पेन्शन योजनेसह  उपदान आणि कुटुंब निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने भव्य जुनी पेन्शन संकल्प यात्रा सुरु झाली आहे. या  निवृत्त कर्मचा-यांच्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी नागपूर विद्यापीठ  यंग टिचर्स असोसिएशनने आपला  पाठींबा जाहीर केला आहे, असे अध्यक्ष डॉ .बबनराव तायवाडे यांनी कळविले आहे .

             पेन्शन हा कर्माचा-यांचा मुलभूत हक्क असून या प्रश्नाकडे शासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी ही  जुनी पेन्शन संकल्प यात्रा  आयोजित करण्यात आली   आहे. ज्या बांधवाना  पेन्शन नाकारली जात आहे अशा शिक्षकांसह सर्व संवर्गातील कर्माचा-यांनी या संकल्प यात्रेत सहभागी होण्याची गरज असल्याचे सांगत  नागपूर विद्यापीठ  यंग टिचर्स असोसिएशनने आपला  पाठींबा जाहीर केला  आहे. तसेच शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या न्यायोचित  व मुलभूत हक्काच्या मागणीसाठी नागपूर, वर्धा, भंडारा व  गोंदिया या चारही जिल्हयातील रातुम नागपूर विद्यापीठाशी संबंधित  शिक्षक व प्राध्यापकांनी या भव्य पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन नागपूर विद्यापीठ यंग टिचर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे व अन्य पदाधिकारी यांनी जाहरपणे केले आहे. तरी रातुम नागपूर विद्यापीठाशी संबंधित  शिक्षक व प्राध्यापकांनी या भव्य पेन्शन संकल्प यात्रा व महामोर्च्यात  मंगळवार दि.२७ डिसेंबर रोजी सक्रियरीत्या   सहभागी व्हावे असे आवाहन  नागपूर विद्यापीठ यंग टिचर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात  आले आहे .