संत गाडगेबाबा पुण्यतिथीच्या निमित्ताने जेष्ठ नागरिक व मातांचा सन्मान

0
23

अर्जुनी मोरगाव,दि.26ः संत गाडगेबाबा उत्सव समितीच्यावतीने संत गाडगेबाबा यांची 66 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात जेष्ठ माता,विधवा माता तसेच विशेष माता पुरस्काराने महिलांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्वेश भुतडा नगरसेवक,दानेश साखरे नगरसेवक,मुकेश जैस्वाल उद्योगपती,सनत वाढई वरिष्ठ उपाध्यक्ष महा.प्रदेश,बंटी श्रीबांसरी अध्यक्ष गोंदिया,गणेश क्षीरसागर भंडारा,जयश्री वाढई,लक्ष्मी श्रीबासरी भोजराज कडीखाये उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ माता सन्मानाने श्रीमती शांताबाई मोहन वाढई मोरगाव, सौ.रेणुका गजानन कावळे खैरी, श्रीमती सिताबाई मारोती लांजेवार केशोरी, सौ.पुष्पा बाई नारायण कावळे खैरी, श्रीमती सुंदरबाई बालाजी कावळे दिघोरी, श्रीमती सरस्वती नामदेव सुरणकर वडसा, श्रीमती गोपिका रामकृष्ण कावळे वडसा, श्रीमती सुनीता मंगरू कावळे वडसा, श्रीमती तानाबाई पांडुरंग धाकडे कोरंभीटोला(sc), श्रीमती मंजुबाई गोपाल उईके अर्जुनी (आदिवासी), श्रीमती ताराबाई मोतीराम कोवे अरतत्तोंडी (आदिवासी), श्रीमती दारणबाई बिषेस्वर मिरी धमदिटोला (आदिवासी), मंगलाताई चंद्रमोहन सोनुने ब्रह्मपुरी, श्रीमती जास्वंदा शामराव राजगडे ईटखेडा यांचा साळी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
विधवा माता सन्मान
श्रीमती डुलेश्वरी अरविंद मोटकर नवेगाव/बांध, श्रीमती मीना रमेश बनपूरकर निमगाव (कलार), श्रीमती वनिता विजय कावळे कुंभिटोला, श्रीमती अरुणा पुरुषोत्तम वाढई नवेगाव/बांध, श्रीमती माया ऋषी वाढई नवेगाव/बांध
विशेष माता सन्मान
सौ.लक्ष्मीताई शिरीष कुमार श्रीबांसरी सरपंच ग्रा.पं. दवणीवाडा, सौ.अमृता महेश मडावी अंगणवाडी मदतनीस धमदिटोला
जेष्ठ नागरिक सन्मान
गजानन पंढरी कावळे खैरी, नारायण विठोबा कावळे खैरी,मधुकर विठोबा कावळे खैरी,अशोक हरीचंद्र केळवतकर पुलगाव,सदाराम चंदर बोरकर कुंभिटोला
समाज भुषण पुरस्कार
बाबुराव महादेव क्षिरसागर देवरी,सौ.लक्ष्मीताई शिरीषकुमार श्रीबांसरी सरपंच ग्रा.पं. दवणीवाडा,डॉ. जगदीश मारोती बारसागडे नागपूर यांचाही सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सनत वाढई यानी केले.तर  संचालन नरेश केळझरकर यांनी व आभार रमेश मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमासाठी अशोक भाग्यवंत, सचिन मेश्राम, मुकेश वाढई, मयाराम काळे,दयाराम बारसागडे, धनराज पिल्लेवान,सुरेश शेंडे,विकास कावळे,प्रभू कावळे,सुनिल मेश्राम, सुनील लांजेवार, तुलाराम मेश्राम, घनश्याम वाढई,तेजराम मेश्राम, ओमप्रकाश बोरकर, संजय पिल्लेवान,स्वाती वाढई, सविता भाग्यवंत, आशा काळे,पुष्पा मेश्राम, सुनीता शेंडे, योगेश्वरी मेश्राम, मंदा पिल्लेवान, संध्या वाढई,शालीनी पिल्लेवान,भावना हरकंडे आदींनी सहकार्य केले.